विजय वंजारा, प्रतिनिधी मुंबई, 16 मार्च : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. चोरीच्याही घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोरीच्या घटना तुम्ही याआधी ऐकल्या असतील, वाचल्या असतील. मात्र, मुंबईतून आता एक धक्कादायक घटना घडली. कस्तुरबा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेडबुल चोरीला गेला आहे. 1 नाही, 2 नाही तर एकूण तब्बल 400 पेट्या चोरीला गेल्या. चोरी केलेल्या या रेड बुलची किंमत सुमारे 10 लाख रुपये आहे. या रेड बुल चोरीप्रकरणी कस्तुरबा पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे. भरत राधेश्याम यादव (37, डिसेंबरपूर, लालगंज, उत्तर प्रदेश) आणि आदित्य कुमार रामप्रकाश निषाद (24, बोरिवली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या दोन्ही आरोपींकडून 100 टक्के माल म्हणजे रेड बुलचे 400 बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. सध्या कस्तुरबा पोलीस या रेड बुल चोरी प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच या चोरीच्या घटनेत आणखी कोण कोण सहभागी आहेत, याचा तपास करत आहे. हेही वाचा - सैराटची पुनरावृत्ती, बहिणीने केलं Love Marriage, पुढे घडलं भयानक कांड नवी मुंबईत दिवसाढवळ्या गोळीबार - नवी मुंबईच्या नेरुळमध्ये दिवसाढवळ्या गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. दोन जणांनी मोटरसायकलवर येऊन कारमधून जाणाऱ्या व्यक्तीवर गोळीबार केला आहे. या गोळीबारात हल्ला झालेली व्यक्ती जागीच ठार झाली आहे. हल्ला केल्यानंतर हे दोघेही जण घटनास्थळावरून पसार झाले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.