सय्यद कयम रजा, प्रतिनिधी पीलीभीत, 23 जुलै : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून आत्महत्या, हत्या, तसेच बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत. यातच आता आणकी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना लव्ह, सेक्स आणि धोका याच प्रकारावर आधारित आहे. एका मुलीचा अश्लील फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल केल्याची ही घटना समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आधी आरोपीने पीडित अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केला. तसेच तरुणीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने लग्नास नकार देत तरुणीचा आक्षेपार्ह फोटो व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर व्हायरल केला. उत्तर प्रदेशातील पिलीभीतच्या माधोतांडा पोलीस स्टेशन परिसरामध्ये ही घटना घडली असून या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
मनीष तरफदार असे या प्रकरणातील आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी या परिसरातील एका गावातील रहिवासी असलेल्या पीडितेने सांगितले की, नेवारिया पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात तिच्या बहिणीचे लग्न झाले होते. लग्नानंतर ती बहुतेक तिच्या मोठ्या बहिणीच्या घरी राहायची. मात्र, याचदरम्यान, हजारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेला मनीष तरफदार हासुद्धा त्या गावात येत असे. यावेळी मनीषने या पीडित अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. दरम्यान, तरुणीने मनीषवर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केल्यावर मनीष तिला टाळत राहिला. दरम्यान, मनीषने या अल्पवयीन मुलीसोबत प्रेमाचे नाटक करत अश्लील फोटोही काढले. अशा परिस्थितीत मुलीने आरोपी मनीषपासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली असता मनीषने तरुणीशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. इतकेच नव्हे तर तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर 13 ला आरोपी मनीषने पुन्हा एकदा अल्पवयीन पीडितेवर शारिरीक संबंधांसाठी दबाव टाकला. त्याने तिला फोन केला. पण तिने त्याला नकार दिला. मात्र, याचा राग येऊन आरोपीने पीडितेचा अश्लील फोटो व्हॉट्सअॅप आणि इंस्टाग्रामवर व्हायरल केला. यानंतर याप्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांनी तरुणाच्या कुटुंबीयांकडे तक्रार केली. मात्र, आरोपीच्या कुटुंबीयांनी आरोपीला साथ देत त्यांना घरातून हाकलून दिले. अखेर पीडितेच्या कुटुंबीयांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेला प्रकार सांगितला. तसेच याप्रकरणी मनीष आणि त्याची आई अनिता, वडील प्रमोद यांच्या विरोधात तक्रार दिली असून कठोर कारवाई करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन नेवारिया पोलिसांनीही या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करुन तपास सुरू केला आहे.

)







