मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

कोल्डड्रिंक देऊन बेशुद्ध केलं, नंतर मैत्रिणीच्या मित्राचं विवाहितेसोबत धक्कादायक कृत्य

कोल्डड्रिंक देऊन बेशुद्ध केलं, नंतर मैत्रिणीच्या मित्राचं विवाहितेसोबत धक्कादायक कृत्य

ग्वाल्हेरच्या मेवाती परिसरात एक 27 वर्षीय तरुणी राहते. तिचे लग्न झालेले आहे.

ग्वाल्हेरच्या मेवाती परिसरात एक 27 वर्षीय तरुणी राहते. तिचे लग्न झालेले आहे.

ग्वाल्हेरच्या मेवाती परिसरात एक 27 वर्षीय तरुणी राहते. तिचे लग्न झालेले आहे.

ग्वाल्हेर, 16 जुलै : मध्यप्रदेशच्या ग्वाल्हेर राज्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याठिकाणी एका विवाहित महिलेवर बलात्कार करण्यात आला आहे. पीडित महिला आपल्या मैत्रिणीच्या घरी तिला भेटायला गेली होती. याठिकाणी पीडित महिलेच्या मैत्रिणीच्या मित्राने तिच्यावर बलात्कार केला. समाजाच्या भीतीने ही बाब तिने दोन महिले लपवली. मात्र, अखेर तिने दोन महिन्यानंतर पतीला ही बाब सांगितली. यानंतर ही घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित महिलेची मैत्रीण आणि आरोपी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेरच्या मेवाती परिसरात एक 27 वर्षीय तरुणी राहते. तिचे लग्न झालेले आहे. या 27 वर्षीय विवाहित तरुणीची शेजारी राहणाऱ्या एका तरुणीसोबत मैत्री होती. ती नेहमी तिच्या घरी येत जात असे. नेहमीप्रमाणे ती आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. यावेळी त्याठिकाणी आधीच राहुल शर्मा नावाचा तरुण उपस्थित होता. यानंतर राहुल कोल्ड ड्रिंक घेऊन आला आणि ते प्यायल्यानंतर ती बेशुद्ध झाली. यानंतर राहुल शर्माने पीडित विवाहित तरुणीसोबत दुष्कर्म केले.

हेही वाचा - चारित्र्याच्या संशयावरुन आधी पत्नीची हत्या, दोन दिवसांनी भावालाही संपवलं अन् नंतर..

पीडितेला जेव्हा शुद्ध आल्यावर तिच्यासोबत वाईट घटना घडल्याचे तिला जाणवले. मात्र, यानंतरही समाजाच्या भीतीने ती अनेक दिवस गप्प राहिली. मात्र, अखेर तिने हिम्मत करत आपल्या पतीला याबाबत सांगितले. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा आरोपी राहुल शर्मा आणि त्याची मैत्रीण या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. दोन्हीही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

First published:

Tags: Crime news, Gwalior, Rape news