गोपालगंज, 27 जून : बिहारच्या गोपालगंजमध्ये अल्पवयीन ऑर्केस्ट्रा डान्सरवर बलात्काराचं प्रकरण समोर आलं आहे. तेथे बलात्कारानंतर रात्रभर पीडिता पोलीस ठाणे तर पीएचसीपर्यंत मेडिकल आणि न्यायाची मागणी करीत होती. पीडित डान्सर सदर रुग्णालयात अनेक तास इथं-तिथं भटकत राहिले. त्यानंतर एसपीने पुढाकार घेतल्यानंतर पीडितेला पोलिसांनी ठाण्यात बोलावलं. येथे पीडितेच्या वक्तव्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मोहम्मदपूरमधील जोधन येथील आहे. अल्पवयीन पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, ती मोहम्मदपूर ज्योती ऑर्केस्ट्रा ग्रुपमध्ये डान्सचं काम करते. शनिवारी रात्री त्यांच्या ग्रुप डान्सचा कार्यक्रम करण्यासाठी मोहम्मदपूरमध्ये जोधनमध्ये पाठवण्यात आलं होतं. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, कार्यक्रमानंतर ऑर्केस्ट्रा संचालकाने त्याला आणि अन्य डान्सरला घरी सोडण्यासाठी दबंग तरुणांसोबत बाईकवर पाठविण्यात आलं होतं. हे ही वाचा- VIDEO ‘बस्सं झालं कोविड कोविड, आम्ही जगायचं कसं?’ लोकलमध्ये अडवलेला तरुण संतापला पिस्तूलच्या भीतीने केला बलात्कार पीडितेने सांगितलं की, गावातून निघाल्यानंतर थोड्या अंतरावर तरुणांनी पिस्तूल काढलं आणि अल्पवयीन मुलींना शेतात घेऊन जात त्यांच्यावर बलात्कार केला. दोन्ही मुली वारंवार त्यांना सोडण्याची मागणी करीत होते. मात्र तरुणांनी त्यांचं ऐकलं नाही. बलात्कारानंतर आरोपी पीडितेला धमकी देऊन घटनास्थळाहून फरार झाले. पोलीस कर्मचारीने पीडितेला मेडिकल चाचणी केल्यानंतर ठाण्यात यायला सांगितलं पीडिता रात्रीच्या वेळी घटनास्थळाहून पायी ऑर्केस्ट्रा संचालकांच्या घरी पोहोचली. मात्र संचालकाने त्यांना मदत करण्यास नकार दिला. त्यानंतर दोघी पोलीस ठाण्यात पोहोचल्या. येथे ड्यूटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी सकाळी त्यांचं मेडिकल केल्यानंतर पोलीस ठाण्यात या, असं सांगून त्यांना पळवलं. त्यानंतर दोघी स्वत:च रुग्णालयात गेल्या आणि मेडिकल तपासणीसाठी इथं-तिथं भटकत होत्या. पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या पश्चिम बंगालमध्ये राहतात. त्या ऑर्केस्ट्रामध्ये काम करून आपलं शिक्षण पूर्ण करीत आहेत. शनिवारी त्यांच्यासोबत बलात्काराचा प्रकार घडला. यांतर दोघींनी न्यायाची मागणी केली आहे. पीडितेने सांगितलं की, गोपालगंजमध्ये आपल्या घरातील सदस्यांना न सांगता ते ऑर्केस्ट्रामध्ये नाचत आहेत आणि कुटुंब, शिक्षणाचा खर्च उचलत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.