गांधीनगर, 26 फेब्रुवारी : गुजरातमधील (Gujrat News) राजकोटवरील अवध रोडवर एक तरुणी जखमी अवस्थेत दिसली होती. तिला स्थानिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केलं. यानंतर पोलिसही रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी तरुणीची चौकशी केली असता धक्कादायक बाब समोर आली. प्राथमिक तपासात तरुणीने सांगितलं की, तिचं ज्या तरुणासोबत प्रेम संबंध होते, त्याच्या पत्नीने दोन तरुणांच्या मदतीने तिचं अपहरण केलं होतं. यानंतर तिचे हात-पाय बांधून जबर मारहाण करण्यात आली. इतकच नाही तर महिलेने प्रेयसीच्या गुप्तांगात मिर्ची पावडर भरली होती. हात-पाय बांधून पीडितेला रस्त्यावर फेकून दिलं.. सध्या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे, आणि तिची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, पत्नीने पतीला त्याच्या प्रेयसीसोबत पाहिलं होतं. त्यामुळे संतापलेल्या पत्नीने दोन मित्रांसह पतीच्या प्रेयसीचं अपहण केलं आणि तिला जबर मारहाण केली. इतकच नाही तर रागाच्या भरात तिने प्रेयसीच्या गुप्तांगात लाल तिखट भरलं. आणि हात-पाय बांधलेल्या अवस्थेतच तिला रस्त्यावर फेकून दिलं होतं. पोलिसांनी तरुणाची पत्नी आणि तिच्या दोन साथीदारांविरोधात तक्रार दाखल केली आहे. हे ही वाचा- वहिनीवरील प्रेमासाठी पत्नीची क्रूरपणे हत्या; अंगणातच मृतदेहाचे तुकडे तुकडे केले केबल वायरने हात-पाय बांधले… पती आणि त्याची प्रेयसी बाजारात सायकल खरेदी करण्यासाठी स्टोअरवर आले होते. मोहसीन आणि त्याची प्रेमिका सायकल खरेदी करीत होते. तेव्हाच मोहसीनची पत्नी तेथे पोहोचली. आपल्या पत्नीला पाहून मोहसीनला जबर धक्का बसला. दुसरीकडे मोहसीनची पत्नी भयंकर संतापली होती. तिने फोन करून ओळखीच्या दोन तरुणांना बोलावलं. यानंतर ऑटो रिक्षामधून तिचं अपहरण केलं. आणि तिघांनी मिळून तिला जबर मारहाण केली. जेव्हा पत्नीने पतीला रंगेहाथ पकडलं तेव्हा मोहसीनने प्रेयसीला सोडून पळ काढला होता. या सर्व प्रकारानंतरव तरुणीने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीचं वय 40 वर्षे असून तिला 4 मुलंही आहेत. तिचा मोठा मुलगा 20 वर्षांचा आहे. मोहसीनने एका हिंदू तरुणीसोबत प्रेम विवाह केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.