जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराप्रकरणी काँग्रेस MLA पुत्रावर गुन्हा दाखल, आमदार म्हणतो...

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराप्रकरणी काँग्रेस MLA पुत्रावर गुन्हा दाखल, आमदार म्हणतो...

 मात्र अल्पवयीन मुलगी गायब झाली. रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी आली नाही म्हणून तिचा सर्वत्र शोधाशोध सुरू केला.

मात्र अल्पवयीन मुलगी गायब झाली. रात्री उशीरापर्यंत मुलगी घरी आली नाही म्हणून तिचा सर्वत्र शोधाशोध सुरू केला.

सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या आमदारावर (Congress MLA) गंभीर आरोप करण्यात आलेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

राजस्थान, 27 मार्च: राजस्थानमध्ये (Rajasthan) महिलांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या आमदारावर (Congress MLA) गंभीर आरोप करण्यात आलेत. अलवर जिल्ह्यातील राजगड विधानसभेचे आमदार जोहरी लाल मीणा यांचा मुलगा दीपक मीणा याच्यासह तिघांवर राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील मंडावर पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यातील रेणी परिसरातून दहावीत शिकणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीचं अपहरण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यानंतर मंडावर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महुआ मंदावर रोडवर असलेल्या समलेती पॅलेस हॉटेलमध्ये पीडितेला नेलं होतं. या हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. यानंतरही आरोपींनी आपला क्रूरपणा थांबवला नाही. मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींनी पीडितेला अनेकवेळा दबावाखाली या हॉटेलमध्ये आणलंआणि वारंवार सामूहिक बलात्कार केला. पीडितेचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा आरोप एवढंच नाही तर आमदाराच्या मुलासह तीन आरोपींनी पीडितेचा व्हिडिओही बनवला. आरोपीनं पीडितेला धमकावण्यासाठी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेनं केला आहे. पीडितेला ब्लॅकमेल करून 15 लाख रुपये आणि दागिने बळकावल्याचा आरोप आहे. सध्या मंडवार पोलीस ठाण्यात आमदार पुत्र दीपक मीना, थुमडा येथील रहिवासी विवेक शर्मा आणि नेत्रम समलेती यांच्या विरोधात पॉक्सो कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, महवाचे डीएसपी ब्रिजेश कुमार या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. आमदारानं फेटाळून लावले आरोप अलवर जिल्ह्यातील राजगढ लक्ष्मणगढचे आमदार जोहरीलाल मीणा यांनी आपल्या मुलावरील आरोपांबाबत सांगितलं की, माझी राजकीय प्रतिमा डागाळण्यासाठी खोटे आणि बनावट आरोप केले जात आहेत. होण्यापूर्वीच हे पूर्णपणे खोटे आरोप आहेत. केस खोटी आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सतीश पुनिया यांनी राजस्थानच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यावर हल्लाबोल करत म्हटलं की, मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत. त्यांच्या काँग्रेस आमदाराच्या मुलावर अशा गुन्ह्याचा गुन्हा दाखल होत असताना ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. राज्यात गुंडराज झाला आहे. आई-बहिणींनीचे श्राप घेतले तर काय होईल हेही तुम्हाला माहित आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात