13 वर्षांच्या मुलाला वेश्याव्यवसायात ढकललं; लिंग परिवर्तन केल्यानंतर वारंवार करीत होते सामूहिक बलात्कार

13 वर्षांच्या मुलाला वेश्याव्यवसायात ढकललं; लिंग परिवर्तन केल्यानंतर वारंवार करीत होते सामूहिक बलात्कार

जर कोणाला सांगितलं तर कुटुंबाला मारण्यात येईल अशी धमकी दिल्याने किरण पुरता घाबरला होता

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जानेवारी : दिल्लीतील (Delhi) गीता कॉलनी भागात अत्यंत लज्जास्पद प्रकार समोर आला आहे. येथे काही जणांनी मिळून 13 वर्षांच्या मुलाचं जबरदस्तीने लिंक परिवर्तन केलं (Sex Change) आणि बराच काळ ते त्याच्यासोबत सामूहिक अत्याचार करीत होते. या नराधमांच्या तावडीतून पळ काढल्यानंतर या धक्कादायक प्रकरणाचा खुलासा झाला. (Pushed a 13-year-old boy into prostitution) दिल्ली पोलिसांनी या आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

तब्बल तीन वर्षांपूर्वी आरोपीसोबत या मुलाची भेट लक्ष्मीनगर मधील एका डान्स इव्हेंटमध्ये झाली होती. येथे आरोपींनी किरण (नाव बदललं आहे) सोबत मैत्री केली आणि त्याला डान्स शिकवण्याच्या बहाण्याने मंडावली येथे घेऊन गेले. किरण काही काळ डान्सच्या कार्यक्रमात सहभागी होत होता आणि यासाठी आरोपींनी त्याला काही पैसेही दिले. त्यानंतर काही काळाने किरणला येथे राहून काम करावं लागणार असल्याचं सांगण्यात आलं. ते किरणला नशीची औषधं देत होते. काही दिवसांनी तर त्यांनी किरणचं जबरदस्तीने लिंक परिवर्तनची शस्त्रक्रिया करायला लावली. त्यावेळी किरण अवघ्या 13 वर्षांचा होता. किरणने सांगितलं की शस्त्रक्रियेनंतर त्याला हार्मोन्सही दिले जात होते, जेणे करुन तो पूर्णपणे मुलगी सारखा दिसेल.  किरणसोबत आरोपी आणि त्याचे मित्र सामूहिक बलात्कार करू लागले. इतकच नाही तर बाहेरील लोकांनाही ग्राहकाप्रमाणे त्याच्याजवळ पाठवलं जात असे. (Pushed a 13-year-old boy into prostitution)

ट्रॅफिक सिग्नलवर किन्नर बनवून फिरवत होते

किरणला रस्त्यावर उभं राहून भीक मागण्यास सांगितलं जात असेल. त्याशिवाय आरोपीदेखील स्वत: महिलांचे कपडे घालून वेश्याव्यवसाय करीत होते. त्यानंतर ग्राहकांना मारहाण करुन त्यांच्याकडून पैसे उकळत असत. जर कोणाला सांगितलं तर कुटुंबाला मारण्यात येईल अशी धमकी दिल्याने किरण पुरता घाबरला होता. काही महिन्यांनंतर किरणच्या ओळखीच्या मुलालाही आरोपींना त्या घरात आणून ठेवलं होतं. तो मुलगा किरणच्या डान्स कार्यक्रमात कॅटरिंगचं काम करीत होता. आरोपी जेव्हा किरणला बाजारात पाठवत तेव्हा तो गुपचूप आपल्या आईला जावून भेटत असे. (Pushed a 13-year-old boy into prostitution)  मात्र त्यांच्या भीतीने त्याने पोलिसात तक्रार केली नाही. मार्च 2020 मध्ये लॉकडाऊनदरम्यान किरण आणि त्याच्या मित्राने तेथून पळ काढल.

किरणच्या आईने दोघांसाठी एका भाड्याच्या घरात राहण्याची सोय केली. मात्र डिसेंबरमध्ये आरोपींना त्याची खबर लागली, ते तेथे आले व दोघांना खूप मारहाण केली. त्यानंतर चारही आरोपींनी दोघांवर बलात्कार केला. इतकच नाही त्यांनी किरणच्या आईलाही बंदूकीचा धाक दाखवला. त्यानंतर दोघे तेथून पळाले व दिल्ली रेल्वे स्टेशनवर लपून बसले. दुसऱ्या दिवशी एका वकिलांनी दोघांना तेथे पाहिलं आणि त्यांना घेऊन दिल्ली महिला आयोगात तक्रार दाखल करण्यासाठी घेऊन गेले.

हे ही वाचा-पुण्यातील बँकेवर ED ची धाड; 71 हजार कोटींच्या घोटाळा प्रकरणात NCP चा MLA गजाआड

किरणने सांगितलं की पोलीस वारंवार त्याच्यावर तक्रार परत घेण्यासाठी दबाव आणत होती. त्यामुळे त्याला भीती होती की जर एफआयआर दाखल झाली तर त्यालाही तुरुंगात जावं लागेल. दिल्ली महिला आयोगाच्या सदस्यांनी या प्रकरणात तातडीने कारवाई केली व या प्रकरणात एफआयआर दाखल केली. किरणने दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांची भेट घेतली आणि आपली कहाणी सांगितली. त्यानंतर यावर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: January 15, 2021, 10:11 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या