मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /धारदार शस्त्रांनी सपासप वार, राष्ट्रवादीच्या सरपंचाची हत्या, पुण्यात खळबळ

धारदार शस्त्रांनी सपासप वार, राष्ट्रवादीच्या सरपंचाची हत्या, पुण्यात खळबळ

पुण्यामध्ये सरपंचाची हत्या

पुण्यामध्ये सरपंचाची हत्या

साई बाबांचं प्रति शिर्डी अर्थात मावळातील प्रति शिर्डी शिरगावच्या सरपंचांवर धारदार शस्त्रांनी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सरपंचांचा मृत्यू झालाय.

गणेश दुडम, प्रतिनिधी

मावळ, 1 एप्रिल : साई बाबांचं प्रति शिर्डी अर्थात मावळातील प्रति शिर्डी शिरगावच्या सरपंचांवर धारदार शस्त्रांनी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात सरपंचांचा मृत्यू झालाय. या घटनेनं मावळ तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. प्रवीण गोपाळे असं मयत सरपंचांचे नाव आहे. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी वार केलेत.

या हल्ल्यानंतर गोपाळे घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यानंतर तातडीनं त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. हा हल्ला नेमका का करण्यात आला? हे हल्लेखोरांच्या अटकेनंतर स्पष्ट होणार आहे. पिंपरी चिंचवड पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

जमिनीच्या प्लॉटिंगमधून ही हत्या झाल्याचा पोलीसांना संशय आहे. प्रवीण गोपाळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे होते. साधारण 9 वाजण्याच्या सुमारास गोपाळे यांच्यावर हल्ला करण्यात आला.

First published:
top videos