मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /'आम्हीच एरियातले भाई, मध्ये आलात तर...', पुण्यात पुन्हा कोयते बाहेर, Video

'आम्हीच एरियातले भाई, मध्ये आलात तर...', पुण्यात पुन्हा कोयते बाहेर, Video

पुण्यात पुन्हा कोयता गँग ऍक्टिवह, चौघांना अटक

पुण्यात पुन्हा कोयता गँग ऍक्टिवह, चौघांना अटक

पुण्यामध्ये पुन्हा एकदा दहशत माजवण्यासाठी कोयते बाहेर आले आहेत. आम्हीच एरियातील भाई म्हणत 4 तरुणांनी कोयते घेऊन दहशत माजवली.

पुणे, 9 मार्च : पुण्यामध्ये पुन्हा एकदा दहशत माजवण्यासाठी कोयते बाहेर आले आहेत. आम्हीच एरियातील भाई म्हणत 4 तरुणांनी कोयते घेऊन दहशत माजवली. पुण्याच्या उत्तमनगर भागात या चौघांनी कोयते नाचवले, याप्रकरणी पोलिसांनी या चारही जणांना अटक केली आहे. चंद्रकांत सुतार (30), सूरज गायकवाड (22), राहुल धोडगे (28), अथर्व यनपुरे (19) असे अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे चारही आरोपी मद्यधुंद अवस्थेत असताना त्यांची कोणाशी तरी शाब्दिक चकमक झाली, त्यानंतर हे चारही जण या व्यक्तींना शोधण्यासाठी उत्तमनगर भागातील कोंढवे धावडे परिसरात आले. या परिसरात येताच त्यांनी त्यांच्याकडे असलेले कोयते काढले आणि दुचाकीवरून परिसरात दहशत माजवली.

'आम्ही या एरिया मधील भाई आहोत, कोणी आमच्या मध्ये आलं तर खाल्ल्यास करून टाकू', असे म्हणत त्यांनी नागरिकांवर कोयते उगारले. दरम्यान, त्यांनी या ठिकाणी असलेल्या एका दुकानातील फ्रिजवर पडलेला पेव्हर ब्लॉक मारला. या घटनेमुळे परिसरात काहीसा तणाव निर्माण झाला होता. काही वेळ गोंधळ घातल्यानंतर या चार जणांनी तिथून पळ काढला. पोलिसांनी तात्काळ या घटनेची नोंद घेऊन या सगळ्यांना अटक केली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

मागच्या काही महिन्यांमध्ये पुण्यात कोयते घेऊन रस्त्यावर दादागिरी करणाऱ्यांची दहशत वाढली आहे, यानंतर पुणे पोलिसांनीही या गुंडांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली, तसंच कोयत्याच्या दुकानांवरही छापे टाकले होते. पोलीस कारवाईनंतर काही काळ या घटना थांबल्या होत्या, पण आता पुन्हा एकदा कोयता गँगने डोकं वर काढलं आहे.p

First published:
top videos