जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / चारित्र्यावर संशय घेत पत्नीच्या गुप्तांगाला हिटरचे चटके, स्वतःच्या मुलींसमोरच.. पुण्यातील प्रकार

चारित्र्यावर संशय घेत पत्नीच्या गुप्तांगाला हिटरचे चटके, स्वतःच्या मुलींसमोरच.. पुण्यातील प्रकार

सांकेतिक छायाचित्र

सांकेतिक छायाचित्र

पुण्यात एका पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत अतिशय घृणास्पद कृत्य केलं आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

वैभव सोनावणे, प्रतिनिधी पुणे, 4 मे : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिचे हातपाय बांधून गुप्तांगाला हिटर गरम करून चटके दिल्याचा क्रूर प्रकार समोर आला आहे. इतकेच नाही तर हात पाय बांधलेल्या अवस्थेत असताना पत्नीसोबत अतिशय क्रूररित्या शारीरिक संबंध ठेवले. पुण्यातील कोंढवा परिसरात हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी 35 वर्षीय पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर 40 वर्षीय आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 एप्रिल रोजी हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. काय आहे प्रकरण? याप्रकरणी अधिक माहिती अशी की, आरोपी पतीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. घटना घडल्याच्या दिवशी पीडित महिला त्यांच्या सोळा वर्षे मुलीचा मोबाईल पाहत होत्या. पत्नी कोणासोबत तरी बोलत असल्याचा संशय आरोपी पतीला आला. यानंतर त्याने पीडितेला हाताला धरून बेडरूम मध्ये घेऊन गेला. फिर्यादींची चार मुले या संपूर्ण प्रकाराने घाबरून गेली. आरोपीने दरवाजा बंद करून महिलेच्या सलवार आणि ओढणीने त्यांचे हातपाय बेडला बांधले. त्यानंतर हिटर गरम करून फिर्यादीच्या गुप्तांगावर चटके दिले. इतकेच नाही तर अशा अवस्थेत अतिशय क्रूररित्या त्याने पत्नी सोबत शारीरिक संबंध ठेवले. वाचा - जिलेटीन स्फोटात तरुणाचा मृत्यू, 25 फूट उडाले मृतदेहाचे तुकडे, अपघात की हत्या? आरोपीने पत्नीसोबत अतिशय घृणास्पद कृत्य करत फिर्यादीच्या तोंडात स्वतःचा पाय घातला. इतकेच नाही तर अंगावर लघु शंका देखील केली. त्यानंतर फिर्यादीच्या हातापायावर आणि डोक्यावर खलबत्त्याने मारहाण केली. दरम्यान मुली बाहेर जास्त आरडाओरडा करू लागल्याने आरोपीने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर आरोपीने 16 आणि 11 वर्षीय मुलीकडे पाहून देखील अश्लील कृत्य केले. घडल्या प्रकाराने पीडितेला मोठा धक्का बसला. या प्रकरणी पत्नीने आरोपी पतिविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी बलात्कार आणि अनैसर्गिक कृत्य आणि पोक्सओ कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , Pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात