जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Pune terrorist : पुण्यातील संशयित दहशतवाद्यांबद्दल मोठी अपडेट; एका चुकीने आला होता संशय

Pune terrorist : पुण्यातील संशयित दहशतवाद्यांबद्दल मोठी अपडेट; एका चुकीने आला होता संशय

पुण्यातील संशयित दहशतवाद्यांबद्दल मोठी अपडेट

पुण्यातील संशयित दहशतवाद्यांबद्दल मोठी अपडेट

Pune terrorist : पुण्यात ताब्यात घेतलेल्या संशयित दहशतवाद्यांबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 19 जुलै : पुण्यातून ताब्यात घेतलेल्या दोन संशयित दहशतवाद्यांना 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयने दोन्ही आरोपींना 25 जुलैपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली. मंगळवारी पुणे पोलीस आणि एटीएसने संयुक्त कारवाई करत दोघांना कोथरुड येथून अटक केली होती. मोहमद ईनुस साखी व इम्रान खान अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोन्ही आरोपींकडे संशयास्पद वस्तू आढळल्या होत्या. दोघांनी देशविरोधी कारवाई केल्याच्या आरोप यांच्यावर आहे. या सगळ्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपींच्या कस्टडीची मागणी केली होती. काय आहे प्रकरण? याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोथरूड पोलिसांच्या नाईट राऊंडमध्ये दुचाकी चोरताना  दोन आरोपी सापडले. इम्रान खान आणि मोहम्मद युनुस अशी त्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडे चौकशी करताना ते  देशांतल्या सगळ्यात मोठ्या एजन्सी शोधत असलेल्या आणि तब्बल पाच लाखाच बक्षीस असलेले दहशतवादी आहेत याची पुसटशी कल्पनासुद्धा पोलिस हवालदार अमोल नजन आणि प्रदीप चव्हाण यांना नव्हती. संशयास्पद हालचालींवरून चौकशी केल्यानतंर जेव्हा शेवटी माहिती समोर आली तेव्हा पोलिस खात्यातील सर्वांनाच धक्का बसला. चौकशी करत रात्रीच घरझडती घेतली. तसंच त्यांच्याशी संबंधितांचे मोबाईल नंबर या दोघांनी मागितले होते. तेव्हा हे नंबर देताना या संशयित दहशतवाद्यांनी हिंदू व्यक्तीची नाव सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. पण दिलेले नंबर आणि सांगितलेली नावं फोन लावून पडताळणी करताना काहीतरी गौडबंगाल असल्याच पोलिसांच्या लक्षात आलं. जे नंबर पोलिसांनी डायल केले ते नंबर मुस्लीम नावाने नोंद असल्याच ट्रूकॅालर ॲपवर दिसत होतं. या संशयित आरोपींनी सांगितलेली नावं मात्र हिंदू होती, बस एवढीच गोष्ट अमोल आणि प्रदीप या दोघाना खटकली आणि त्यांनी नेटाने पुढचा त्रास सुरू केला. वाचा - True caller वर संशय अन् जिगरबाज पुणे पोलिसांनी खतरनाक दहशतवाद्यांच्या आवळल्या मुसक्या आरोपींना कोथरूड पोलीस स्टेशनला आणून एक टीम त्यांच्या कोंढव्यात भाड्याने राहत असलेल्या घरी पाठवली. तिथे पोलिसांना बंदूकीची एक गोळी आणि पिस्तूलाचं कव्हर, एक कुऱ्हाड आणि लॅपटॅाप सापडले. आणखी खोलात चौकशी केल्यावर लॅपटॅाप तपासल्यावर प्रत्येक फाईलला लॅाक असल्याच पोलिसांना लक्षात आलं. एक्सपर्टच्या मदतीने हे लॅाक क्रॅक केल्यानंतर त्यात काही इस्लामिक साहित्य सापडले आणि पोलीस चक्रावले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली आणि एटीएसला पाचारण करण्यात आले. वरिष्ठ अधिकारी चौकशीत सहभागी झाल्यावर चक्र वेगाने फिरली आणि एनआयए ने हे आरोपी राजस्थानच्या चित्तोडगडमध्ये मार्च २०२२ मध्ये सापडलेल्या स्फोटकाच्या प्रकरणातले फरार आरोपी असल्याच स्पष्ट केले.  दोन साध्या पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि व्यावसायिक पोलिसिंगच्या कौशल्यामुळे देशांतल्या सर्वोच्च तपासयंत्रणेला हवे असलेले दहशतवादी पकडून दिलेत. आता या पोलिस कर्मचार्यांना एनआयए ने या दहशतवाद्यांवर जाहीर केलेले पाच लाखाचे इनाम द्यावेत अशी इच्छा व्यक्त केली जातेय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात