Home /News /crime /

धक्कादायक! कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या पोलिसांना गावकऱ्यांकडून मारहाण, 7 जण गजाआड

धक्कादायक! कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या पोलिसांना गावकऱ्यांकडून मारहाण, 7 जण गजाआड

Corona Patient Death: कोरोना रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या पोलिसांवर गावकऱ्यांनी हल्ला करून त्यांना मारहाण केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतलं आहे.

    नवी दिल्ली, 17 मे: मागील काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणू (Corona virus) झपाट्यानं वाढत आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona virus 2nd Wave) अत्यंत संसर्गजन्य  ठरत असून याचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ग्रामीण भागातील लोकंही आता कोरोना विषाणूच्या कचाट्यात सापडत आहेत. परिणामी कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनामुळे भीतीचं वातावरण तयार झालं आहे. अशा स्थितीत कोरोनाच्या भीतीनं गावकऱ्यांनी थेट पोलिसांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही ओडीसा राज्यातील सोनारीपोसी या गावातील आहे. याठिकाणी गावकऱ्यांनी कोरोना साथीच्या भीतीनं पोलीसांना आणि सरकारी कर्मचाऱ्यांना जबरी मारहाण (Villagers beat police officer) केली आहे. अशी माहिती मिळत आहे की, संबंधित पोलीस आणि सरकारी कर्मचारी एका कोरोना रुग्णाला अत्यंविधीसाठी (corona patient Funeral) या गावात घेऊन आले होते. त्यामुळे गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त करत कोरोना रुग्णावर अत्यंसंस्कार करण्याला विरोध दर्शवला. अशा स्थितीत घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गावकरी गोळा झाले आणि त्यांनी पोलिसांना घेरलं. यानंतर झालेल्या वादात गावकऱ्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसहित पोलिसांना मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी ठाकुरमुंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून सात आरोपींना न्यायालयीन चौकशी साठी ताब्यात घेण्यात आलं आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. हे ही वाचा-शुल्लक कारणावरुन कुटुंबातील 4 जणांवर चाकू हल्ला; LIVE VIDEO आला समोर मागील काही दिवसांपासून ओडिशामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्यानं पसरत आहे. परिणामी राज्यात दररोज नवीन कोरोना बाधित रुग्णांची संख्याही वाढली आहे. सध्या ओडिशात एकूण अॅक्टीव्ह रुग्णांची संख्या 6 लाखांहून अधिक आहे. तसेच आतापर्यंत ओडिशात 2300 पेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Attack on police, Corona patient, Crime news, Odisha

    पुढील बातम्या