पिस्तुल नकली आहे की असली? असं विचारताच मित्राने झाडल्या गोळ्या

पिस्तुल नकली आहे की असली? असं विचारताच मित्राने झाडल्या गोळ्या

रागाच्या भरात सनीने पिस्तुल लोड करून गुरुदीपवर गोळी झाडली. ती गोळी गुरुदीपच्या डाव्या खांद्याला लागून गेली.

  • Share this:

पिंपरी चिंचवड 01 मार्च : पिपंरी- चिंचवडमधल्या एका गोळीबाराच्या घटनेने प्रचंड खळबळ माजलीय. एका रिक्षात बिअर पिणाऱ्या तीन मित्रांमध्ये भांडण झालं आणि त्यातून गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या गोळीबारात एक तरुण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. तर गोळीबार करणारा तरुण हा फरार आहे. सनी रोकडे असं त्याचं नाव असून पोलीस आता सनीचा शोध घेत आहेत. त्याच्याकडे हे पिस्तुल आलं कुठून याचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडमध्ये एका सोसायटीसमोर रिक्षामध्ये सिद्धांत सुनील बहोत, गुरुदीप हरदेवसिंग जावंद हे मित्र बिअर घेत बसले होते. त्यावेळी त्यांचा आणखी एक मित्र सनी तिथे आला. सनीकडे एक पिस्तुल होतं. त्यांच्यात बाचाबाची झाली नंतर त्यांच्याच भांडण झालं.

एका मित्राने नशेच्या भरात सनीला डिवचलं की त्याच्याजवळ असलेलं पिस्तुल हे नकली आहे. त्यावरून त्या मित्रांमध्ये आणखी भांडणं झालं. रागाच्या भरात सनीने पिस्तुल लोड करून गुरुदीपवर गोळी झाडली. ती गोळी गुरुदीपच्या डाव्या खांद्याला लागून गेली. त्यात तो जखमी झाला.

CM उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री' निवासस्थाना बाहेर पिस्तुलासह तरुणाला अटक

नंतर त्याला हॉस्पिटलमध्ये उचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या तिनही मित्रांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी स्वरुपाची आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

निर्भयाच्या दोषींना उद्याच फाशी? सर्वोच्च न्यायालयाने पवनची याचिका फेटाळली

गुन्हागार आणि त्यांच्या टोळ्यांनी उच्छाद मांडल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत. या गुन्हेगारांना राज्यबाहेरून शस्त्रास्त्र येत असल्याने मोठं रॅकेट सक्रिय असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याविषयी वारंवार तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर अनेकदा शस्त्रही जप्त झाले आहेत. असं असताना पोलीस धडक कारवाई का करत नाही असा सवाल विचारला जातोय.

 

 

First published: March 2, 2020, 12:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading