जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पिंपरी चिंचवडमध्ये बहिणीच्या नवऱ्याने तरुणीवर केला कुऱ्हाडीने हल्ला, घटनेनं परिसरात खळबळ

पिंपरी चिंचवडमध्ये बहिणीच्या नवऱ्याने तरुणीवर केला कुऱ्हाडीने हल्ला, घटनेनं परिसरात खळबळ

पिंपरी चिंचवडमध्ये बहिणीच्या नवऱ्याने तरुणीवर केला कुऱ्हाडीने हल्ला, घटनेनं परिसरात खळबळ

आरोपीने आपल्या रेनकोटमध्ये लपवलेली कुऱ्हाड काढून वार करायला सुरुवात केली.

  • -MIN READ
  • Last Updated :

पिंपरी चिंचवड, 28 ऑगस्ट : पिंपरी चिंचवडमध्ये एका नराधमाने महिला पोलीस कर्मचारी असलेल्या आपल्या पत्नीच्या बहिणीवर कुऱ्हाडीने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेल्या 26 वर्षीय सिंधू मोहिते नामक कर्मचारी या घटनेत गंभीर जखमी झाल्या असून सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर सिंधू यांच्यावर हल्ला करणारा नात्याने त्यांचा मोठा भावजी असलेला आरोपी विनोद चव्हाण सध्या फरार असल्याची माहिती आहे. पिंपरीतील चिखली परिसरातील कृष्णानगर पोलीस लाईन परिसरात काल रात्री ही घटना घडली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी विनोद आणि त्यांच्या पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद व्हायचे. ते वाद मिटवण्यासाठी सिंधू प्रयत्न करायच्या. मात्र सिंधू यांची मध्यस्थी आरोपी चव्हाण याला पटत नसल्याने तो गुरुवारी म्हणजे काल रात्री त्यांच्या घरी गेला आणि त्याने अर्वाच्य भाषेत सिंधू यांना धमकावयाला सुरवात केली. तेव्हा सिंधू यांनी त्याला जाण्यास सांगितले. मात्र तिथून जाण्याऐवजी आरोपीने आपल्या रेनकोटमध्ये लपवलेली कुऱ्हाड काढून वार करायला सुरुवात केली. त्यावेळी झालेल्या आरडा ओरड्याने शेजारी धावले आणि पुढील अनर्थ टळला. घटना घडल्या नंतर लगेच पोलिसांना माहिती देऊन तक्रार दाखल केल्याच सिंधू यांनी सांगितलं. हल्ला जीवघेणाच होता मात्र केवळ पोलीस दलात असल्याने आणि स्व रक्षणाचं प्रशिक्षण घेतलेले असल्याने आपण हा हल्ला परतवू शकलो आणि प्रतिकार करू शकल्याचं सिंधू म्हणाल्या. सध्या सिंधू यांची प्रकृती स्थिर आहे तर फरार असलेल्या आरोपी विनोद चव्हाणचा शोध घेण्यासाठी दोन पथक रवाना केल्याची माहिती चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक एस एस साबळे यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात