जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / 2 अल्पवयीन पोरांनी 17 वर्षांच्या मुलीला छळलं, तिने पोलिसांकडे धाव घेतली अन् घडलं भयंकर

2 अल्पवयीन पोरांनी 17 वर्षांच्या मुलीला छळलं, तिने पोलिसांकडे धाव घेतली अन् घडलं भयंकर

2 अल्पवयीन पोरांनी 17 वर्षांच्या मुलीला छळलं, तिने पोलिसांकडे धाव घेतली अन् घडलं भयंकर

महापालिकेच्या रिकाम्या इमारतीमध्ये या युवतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडली आहे.

  • -MIN READ Local18 Pimpri Chinchwad,Pune,Maharashtra
  • Last Updated :

गोविंद वाकडे, प्रतिनिधी पिंपरी चिंचवड :  पिंपरी चिंचवडला हादरवणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लैंगिक छळ केल्याची तक्रार केल्या प्रकरणी अल्पवयीन तरुणांनी 17 वर्षीय युवतीची निर्घृण हत्या केली आहे. ही धक्कादायक घटना चिखली परिसरात घडली. महापालिकेच्या रिकाम्या इमारतीत हत्या केल्याची माहिती मिळाली आहे. हत्या करण्याआधी पीडित युवतीवर 2 अल्पवयीन तरुणांनी अत्याचार केल्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

News18लोकमत
News18लोकमत

शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर अत्याचार केला की नाही हे स्पष्ट होईल असं सांगण्यात आलं आहे.  या प्रकरणी पोलिसांनी दोन अल्पवयीनांना तब्यात घेतलं असून चौकशी सुरू केली आहे.

महिलेने घरीच बाळाला जन्म दिला अन् फेकलं बादलीत…, परिस्थिती ऐकून सगळेच हादरले

ज्या ठिकाणी मयत मुलीचा मृतदेह आढळून आला ती इमारत महानगरपालिकेची एक ऑडिटरियम आहे जिथे अनेक गैरप्रकार घडत असल्याचं स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे. इमारतीचं बांधकाम पूर्ण करून ती महानगरपालिकेकडे सुपूर्द केल्या गेल्या नव्हती त्यामुळे इमारत उभारणाऱ्या ठेकेदाराची जबाबदारी होती की त्यांनी इथे सुरक्षा रक्षक असायला हवे होते. मात्र घटना घडली त्या दिवशी किंवा त्या पासून मागच्या दीड वर्षात इथे कोणीही सुरक्षारक्षक नसल्याचे स्थानिक नागरिकांचा दावा आहे.

प्रेयसीने लग्न केले नाही म्हणून गिफ्ट म्हणून दिला ‘बॉम्ब’, नंतर जे घडलं ते धक्कादायक

संबंधित ठेकेदारा विरोधात महानगरपालिका प्रशासन काही कठोर कारवाई करतोय का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे  सुरक्षारक्षक असते तर कदाचित या ठिकाणी मुलीच्या हत्येचा प्रयत्न झाला नसता असं अनेकांना वाटत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील चिखली परिसरातल्या घरकुल प्रकल्पात हे ऑडिटरियम उभारण्यात येणार आहे, तिथेच पीडित युवतीचा मृतदेह आढळून आला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात