Home /News /crime /

Satara : लग्नाचं आमिष देऊन ठेवले वारंवार शारीरिक संबंध, पीडिता गर्भवती झाल्यावर केलं धक्कादायक कृत्य

Satara : लग्नाचं आमिष देऊन ठेवले वारंवार शारीरिक संबंध, पीडिता गर्भवती झाल्यावर केलं धक्कादायक कृत्य

एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले.

    सातारा, 5 जून :  पोलीस कर्मचाऱ्यानं लग्नाचे आमिष (Marriage Promise) देऊन महिला पोलीस कर्मचाऱ्यावरच अत्याचार (Physical Abuse) केला धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी उघड झाला होता. महाराष्ट्रातील ही धक्कादायक घटना ताजी असतानाच आता सातारा जिल्ह्यात आणखी एक अशाच स्वरुपाची घटना घडली आहे. काय आहे प्रकरण? एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यात आले. यानंतर संबंधित महिला गरोदर राहिल्यानंतर तिचा गर्भपात (Abortion) करण्यात आला आणि या महिलेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुंबई येथील तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समीर शामराव पाटील (वय 29, रा. जोगेश्वरी पूर्व मुंबई) असे महिलेची फसवणूक करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. तर महिलेवर अत्याचार करण्यात आलेल्या महिलेचे वय 30 आहे. अनेकदा शारीरिक संबंध ठेवले या महिलेनं फसवणूक झाल्याचं  लक्षात आल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, समीर पाटील याने 18 मे 2018 पासून ते जानेवारी 2022 या कालावधीत लग्नाचे खोटे आमिष दाखवून पीडितेशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्याने पाचगणी, मनोरी मालाड, बावधन याठिकाणी त्याने या तरुणीवर अत्याचार केला. यातून पीडिता गर्भवती राहिली. मात्र, तिला यानंतर गर्भपात करायला सांगितला आणि तिचा गर्भपात करण्यात आला.  धक्कादायक! माफी मागून माहेराहून परत आणलं; मग रस्त्यातच दाताने चावा घेत तोडलं पत्नीचं नाक मात्र, तरीसुद्धा पीडितेने आरोपी समीर याला लग्नाबाबत वारंवार विचारले. मात्र,त्याने शिवीगाळ केली. तसेच महिलेला बघून घेतो, अशी धमकी दिली. यानंतर पीडितेला आपली फसवणूक झाली आहे, असे तिच्या लक्षात आले आणि तिन पोलीस ठाणे गाठले. पीडितेने मेघवाडी मुंबई पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली. यानंतर हा गुन्हा पाचगणी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महामुलकर करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Satara, Sexual harassment

    पुढील बातम्या