सर्वसाधारणपणे जेव्हा पती, पत्नी आणि तिसऱ्या व्यक्तीचं प्रकरण समोर येतं, याचा शेवट नेहमीच दुखद असतो. अशीच एक घटना बंगळुरू येथून (Bengluru News) समोर आली आहे. या प्रकरणात प्रेम विवाहान आनंदात संसार करणाऱ्या दाम्पत्याच्या मध्ये पतीचा मित्र आला आणि अख्खा संसार उद्ध्वस्त झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नी पतीच्या मित्राच्या प्रेमात पडली. यानंतर दोघांनी मिळून पतीची हत्या केली. पतीचा मृतदेह एका बॅगेत भरून फेकून दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगळुरूतील बंदिमाकलम्मा मंदिराजवळ राहणारा कार्तिक आणि रंजीता दोघं पाच वर्षांपूर्वी प्रेमात पडले होते. ते दोघेही आनंदात होते. मात्र कार्तिकच्या मित्राची एन्ट्री झाल्यानंतर परिस्थिती बदलली. हळूहळू संजीव आणि रंजीता यांच्यामधील जवळीक वाढू लागली आणि ते दोघे प्रेमात पडले. (मृत व्यक्तीची पत्नी रंजीता आणि तिचा प्रियकर संजीव )
आता दोघांच्या प्रेमामध्ये कार्तिक आडकाठी ठरत होता. त्यामुळे कार्तिकचा मित्र संजीवने त्याच्या हत्येचा कट रचला. यासाठी त्याने सुब्रमणी या मित्राला सोबत घेतलं. यासाठी सुरुवातील त्याने कार्तिकला खूप दारू पाजली आणि त्याला घरी घेऊन गेला.
यानंतर संजीवने त्याचा गळा चिरून हत्या केली. यानंतर कार्तिकचा मृतदेह एका पिशवीत भरून कुंभकोणगोडे जवळ फेकून दिला. आणि तेथून पळ काढला. यानंतर पत्नी रंजीताने पोलीस ठाण्यात पती कार्तिक बेपत्ता असल्याची तक्रार केली.
पोलिसांनी तक्रार दाखल करुन घेत घटनेचा तपास सुरू केला. शेवटी पतीच्या हत्या प्रकरणाचा पर्दाफाश झाला.