पालघर, 30 ऑक्टोबर : लैंगिक संबंध प्रस्थापित केल्याच्या चित्रफिती एका अश्लील संकेतस्थळावर अपलोड करून त्याद्वारे पैसे कमविणारा आरोपी बोईसरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या हाताला लागला आहे. मिलिंद अनिल झाडे असं आरोपीचे नाव असून त्याने ही कृत्ये केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी म्हटलं आहे.
धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीने अनेक महिलांचा लैंगिक छळ करून स्वतःसोबत तयार केलेल्या अनेक अश्लील चित्रफिती एका संकेतस्थळावर टाकल्या आहेत. महिलांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याबद्दल या आरोपीवर पालघर जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. गेल्या वर्षभरापासून तो हे अश्लील कृत्य करीत आहे. शेवटी स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) बोईसर युनिटने त्याचा छडा लावून त्याला अटक करण्यात यश मिळविलं.
आरोपी झाडे हा मुंबईत बसवाहक म्हणून काम करत होता असे समजते. गेल्या नोव्हेंबरमध्ये त्याने एका अश्लील दृकश्राव्य संकेतस्थळावर शिव वैशाली या नावाने खाते तयार केले होते.त्यावर त्याने अनेक चित्रफिती टाकल्या आहेत. त्यातून शेकडो डॉलर्सची कमाई केल्याचेही कळते. पैसे कमविण्याच्या नादात महिलांना अनेक आमिषे दाखवत महिलांना त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत असे आणि मोबाईलवर लैंगिक कृत्ये नोंदवण्यास भाग पाडे.
यातील लैंगिक छळ झालेल्या काही पीडितांच्या नातेवाईकांना हे समजल्यानंतर त्यांनी या आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. पीडित मुलींपैकी एकजण एका पिझ्झा स्टोअरमध्ये काम करत असताना झाडेने तिला चांगली नोकरी मिळण्याचे आश्वासन दिले होते. दुसरा बळी ही त्याचीच नातेवाईक होती असे पोलिसानी सांगितले. विक्रमगड आणि वालिव पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचाराचा प्रत्येकी एक गुन्हा झाडेविरुद्ध दाखल आहे. नोव्हेंबर 2019 ते जून 2020 या काळात झाडे याने एका 30 वर्षीय महिलेवर अनेकदा बलात्कार केला असल्याचं उघड झालं आहे. या महिलेने सप्टेंबरमध्ये वालिव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला आहे.
आरोपी झाडे हा कामासाठी धावपळ करत होता आणि तो सतत आपले स्थान बदलत राहिल्याने तो पोलिसांच्या हातात तुरी देऊन पोबारा करीत असे. मात्र, गुरुवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना तो आपल्या घरी आला असल्याची पक्की माहिती मिळाली पोलिसांनी त्याच्या घरी पाचमाड येथे जाऊन त्याला अटक केली. पुढील चौकशीसाठी झाडे याला विक्रमगड पोलीस ठाण्यात सोपविण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.