जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / पाकिस्तानच्या पंजाबात 'घराण्याच्या अब्रु'च्या नावाखाली 6 महिन्यांत 2400 महिलांवर बलात्कार; 90 जणींची हत्या

पाकिस्तानच्या पंजाबात 'घराण्याच्या अब्रु'च्या नावाखाली 6 महिन्यांत 2400 महिलांवर बलात्कार; 90 जणींची हत्या

पाकिस्तानच्या पंजाबात 'घराण्याच्या अब्रु'च्या नावाखाली 6 महिन्यांत 2400 महिलांवर बलात्कार; 90 जणींची हत्या

पाकिस्तानातील महिलांची अवस्था किती भयावह आहे याची साक्ष पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील माहिती आयोगानं जाहीर केलेली आकडेवारी आणि महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या देतात.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    लाहोर, 09 फेब्रुवारी: भारताविरुद्ध सतत बोलण्याचं धोरण असलेला पाकिस्तान (Pakistan) जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) मुस्लिम लोकांवर, महिलांवर अन्याय होत असल्याची तक्रार आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर करत असतो. मानवाधिकार आयोगाकडे भारताविरुद्ध तक्रारी केल्या जातात; मात्र पाकिस्तानातील महिलांची अवस्था किती भयावह आहे याची साक्ष पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील माहिती आयोगानं जाहीर केलेली आकडेवारी आणि महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या देतात. पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात (Punjab Province) गेल्या 6 महिन्यांत घराण्याची अब्रू राखण्याच्या (Honour Killing) नावाखाली 2,439 महिलांवर बलात्कार (Rape) करण्यात आले तर 90 महिलांना मृत्यूदंड (Death) देण्यात आला. ही आकडेवारी फक्त पंजाब प्रांतातील आहे, संपूर्ण पाकिस्तानमधील नाही. पंजाब माहिती आयोगाने (Punjab Information Commission) ही आकडेवारी जाहीर केली आहे. पंजाबमध्ये असलेल्या लाहोरमध्ये (Lahore) गेल्या 6 महिन्यांत सुमारे 400 महिलांवर बलात्कार झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर 2,300 हून अधिक महिलांचे अपहरण (Kidnapping) करण्यात आलं आहे. लाहोरची लोकसंख्या 11 कोटींच्या जवळपास आहे. हे वाचा- शाळेच्या पैशावर जुगार, सट्टा, चैन! प्रिन्सिपल ननने लांबवले शाळेचे तब्बल 8 लाख गेल्याच आठवड्यात, लाहोरपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या सरगोधा जिल्ह्यात एका तरुणानं आपल्या बहिणीवर सामूहिक बलात्कार झाला म्हणून तिची हत्या केली. ही 28 वर्षीय तरुणी 5 मुलांची आई होती. शेजारच्या चार तरुणांनी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे कुटुंबाच्या इभ्रतीला बट्टा लागू नये, म्हणून तिच्या भावानेच तिला गोळ्या घातल्या. पोलिसांसमोर या भावानं आपल्या बहिणीच्या  हत्येचा गुन्हाही कबूल केला. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाने (HRCP) दिलेली आकडेवारी भीषण परिस्थितीची साक्ष देते. एचआरसीपीनुसार, पाकिस्तानमध्ये दररोज सुमारे 11 बलात्काराच्या घटना नोंदवल्या जातात. ही आकडेवारी फक्त अशा गुन्ह्यांची आहे, ज्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. गेल्या 6 वर्षांत अशा 22 हजार घटना घडल्या आहेत. एचआरसीपीच्या अहवालानुसार, महिलांवर बलात्कार करणाऱ्यांना कुटुंबातूनच संरक्षण मिळतं. कुटुंबीय पीडित मुलींनाच दोष देतात. यामुळे आतापर्यंत 22,000 गुन्ह्यांपैकी केवळ 77 बलात्कार प्रकरणे अशी आहेत ज्यात आरोपींना शिक्षा झाली आहे. आरोपींना शिक्षा होण्याचा हा दर फक्त 0.3 टक्के आहे. हे वाचा- अजबच! या गावात तरुणांचे दात घासून केले जातात सपाट, कारण आहे आणखी Shocking जगात अशाप्रकारे ‘कुटुंबाच्या इभ्रतीच्या’ नावाखाली सर्वाधिक बलात्कार आणि खुनाचे गुन्हे पाकिस्तानात घडत असल्याचे नोंदी सांगतात. हा अहवालही ज्या प्रकरणांची नोंद झाली आहे, त्या आधारावर आहे, यावरून सहज लक्षात येईल की परिस्थिती किती भयंकर आहे. या परिस्थितीबाबत बोलताना लाहोर युनिव्हर्सिटीमधील मॅनेजमेंट-सायन्सच्या प्राध्यापिका निदा किरमाणी म्हणतात,‘हे अत्यंत खेदजनक आहे, पण सत्य आहे. पाकिस्तानात ‘बलात्कार-संस्कृती’चं प्राबल्य वाढलं आहे. महिलांवरील हे संकट दूर होण्यासाठी, हा डाग धुण्यासाठी अनेक जण आपापल्या परीने काम करत आहेत. पण ही खूप कठीण आणि दीर्घकाळ चालणारी लढाई आहे

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: pakisatan , Rape
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात