Home /News /crime /

भयंकर! दोन दिवस मृतदेहावरुन गाड्या जात राहिल्या; शेवटी रस्त्यावर हाडं राहिली शिल्लक!

भयंकर! दोन दिवस मृतदेहावरुन गाड्या जात राहिल्या; शेवटी रस्त्यावर हाडं राहिली शिल्लक!

माणूस माणसापासून दिवसेंदिवस लांब जात असल्याचं हे चित्र आहे. ही अंगावर शहारे आणणारी घटना त्याचीच साक्ष देते.

    रीवा, 20 फेब्रुवारी : आजच्या धकाधकीच्या काळात मानवी जगण्याचं मूल्य दिवसेंदिवस कमी होत चाललं आहे. रोज जगभरात अशी उदाहरणं ऐकायला-पहायला मिळतात. मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) रिवा (Rewa) इथं अशीच धक्कादायक घटना घडली आहे. मध्यप्रदेशात रीवा इथं घडलेली घटना वाचून अंगावर भयानक काटा येईल. इथं रस्त्यावर अपघातात (road accident) मरून पडलेल्या एका वृद्धाच्या (old man) शरीराला दोन दिवस गाड्या (vehicles) चिरडत राहिल्या. मात्र कुणीच त्याला पाहण्याची तसदी घेतली नाही. शेवटी या शरीरातील केवळ हाडं (bones) शिल्लक राहिली. विशेष म्हणजे पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांच्या टीमलाही (police patrolling team) या प्रकरणाची काहीच कल्पना अखेरपर्यंत आली नव्हती. शेवटी रस्त्यावर या वृद्धाची केवळ हाडंच शिल्लक राहिली. तिसऱ्या दिवशी रस्त्यावरून पायी जाणाऱ्या व्यक्तीला मळकट आणि फाटलेले कपडे (clothes) तिथं दिसले. त्याला या कपड्यांवर मोठ्या प्रमाणात माशा घोंगावत असल्याचं जाणवलं. खूप असह्य दुर्गंधीही येत होती. या व्यक्तीनं हिम्मत करून या कपड्यांना बाजूला केलं. तेव्हा तिथं हाडं दिसली. या व्यक्तीनं लगोलग पोलिसांना कळवलं. त्यावेळी सगळ्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा झाला. ही हाडं एका माणसाची असल्याचं तेव्हा स्पष्ट झालं. पोलिसांच्या माहितीनुसार, ही व्यक्ती सतना जिल्ह्याच्या सोनवर्षा या गावची राहणारी होती. या 75 वर्षीय गृहस्थांचं नाव संपतलाल होतं. 17 फेब्रुवारीला ते रीवा जिल्ह्यातील चुरहट इथं राहणाऱ्या आपल्या मुलीच्या घरी जात होते. संपतलाल गावाहून आले ते ट्रॅक्टरमध्ये बसून. रामनगरहून ते बसमध्ये बसले. शॉरकीन बायपासवर उतरवून ते पायी चालत निघाले होते. तशात अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली आणि ते जागीच कोसळले. रात्रभर गाड्या या वृद्ध व्यक्तीचा मृतदेह चिरडत पुढे जात राहिल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी केवळ त्यांचे कपडे, घोंगडं आणि हाडं शिल्लक राहिली. त्यावरूनही दुसऱ्या दिवशी गाड्या जाताच राहिल्या. हेही वाचापाठीचा कणा मोडला, डोक्यावर दगडाने केले वार; पीडिता म्हणाली, रेप कर पण..., इकडे दोन दिवस झाले तरी संपतलाल मुलीच्या घरी न पोचल्यानं घरचे त्यांना शोधू लागले. पोलिसांकडे गेल्यावर त्यांना हे कपडे आणि अवशेष मिळाले. हाडं पोलिसांनी पोस्टमार्टमसाठी (postmortem) संजय गांधी रुग्णालयात पाठवली. या वृद्धाला धडक देणाऱ्या गाडीचा तपास अजून लागलेला नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Old man, Road accident

    पुढील बातम्या