पवनसिंग कुंवर (उत्तराखंड), 17 मे : उत्तराखंडमधील हल्दवानीमध्ये एका वृद्ध अंध महिलेच्या हत्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली होती. हत्या करणाऱ्याने कोणताही पुरावा न सोडल्याने पोलिसांना आरोपीला पकडणे आव्हानात्मक काम होते. परंतु अत्यंत कौशल्याने पोलिसांनी अखेर चोरांना पकडले आहे. पोलिसांच्या चौकशीत त्याने हत्येचे जे कारण दिले, ते ऐकून पोलिसही चक्रावले आहेत. आरोपींना न्यायालयात हजर करून कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
दरम्यान पोलिसांनी उत्तराखंडच्या गोरापाडव येथील नंदीदेवी हत्या प्रकरणाचा खुलासा केला आहे. मनोज पुरी असे आरोपीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील बरेली येथील आहे. दरम्यान तो मृत महिला नंदादेवीच् यांच्या शेजारी राहयचा. यादरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणताही सीसीटीव्ही किंवा मोबाईल नसताना गुप्तचर यंत्रणेच्या माध्यमातून हे प्रकरण यशस्वीपणे उकलण्यात आले.
पोलिस चौकशीत मनोजने दिलेल्या माहितीनुसार, तो 4 मे रोजी नंदी आंटीच्या दुकानात बिडी बंडल घेण्यासाठी गेला होता. माझ्याकडे सुटे पैसे नव्हते, म्हणून मी तीला बिडी उधार देण्यास सांगितले. त्यावर तीने मला शिवीगाळ करून विडी देण्यास नकार दिला.
मी तिला म्हणालो तुला बिडी द्यायची नसेल तर देऊ नकोस पण वाईट शब्द वापरू नकोस. त्यानंतर ती आणखी शिवीगाळ करू लागली. मी घरी पोहोचलो परंतु मला तिच्या शिव्या डोक्यात घोंगावत होत्या यातून मला राग आला यामुळे मी तिला मारण्याची ठरवलं आणि हत्या केली.
मनोजने पोलिसांना पुढे सांगितले की, त्याच रात्री मी तीच्या घरात घुसलो आणि नंदी आंटीच्या डोक्यावर हातोड्याने अनेक वार केले. त्यानंतर गळ्यात पडलेल्या स्कार्फने तीचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह बाथरूममध्ये नेऊन पाण्याच्या टबमध्ये डोके बुडवले. यानंतर घरातून कपडे, रोख रक्कम, मोबाईल चोरून तेथून निघून गेल्याची कबुली मनोजने दिली.