Home /News /crime /

आसामचा मालक, बंगालची नॅनी अन् मालकाच्या मुलीला पुण्यात विकण्याचा कट; असं फुटलं महिलेचं बिंग

आसामचा मालक, बंगालची नॅनी अन् मालकाच्या मुलीला पुण्यात विकण्याचा कट; असं फुटलं महिलेचं बिंग

बाळाचा कोरोनाने मृत्यू झाल्यावर पालकांनी त्याचं अंत्यविधी न करताच रुगणालयातून पळ काढला

बाळाचा कोरोनाने मृत्यू झाल्यावर पालकांनी त्याचं अंत्यविधी न करताच रुगणालयातून पळ काढला

रणजित गोगोई (नाव बदललं आहे) मूळचे आसामचे रहिवासी आहेत. ते एका आयटी फर्मचे मालक आहेत आणि कामानिमित्त अहमदाबादमध्ये राहत होते. आपल्या मुलीची देखभाल करण्यासाठी त्यांनी बिंदू शर्मा (Nanny arrested) यांना कामावर ठेवलं होतं

अहमदाबाद 07 ऑगस्ट : आजकाल आई-वडील दोघेही कामाला जात असल्यामुळे घरातील लहान मुलांना सांभाळण्यासाठी कोणीही नसतं. यामुळे बऱ्याच वेळा यासाठी ‘बेबीसिटर’ किंवा ‘नॅनी’ची (Nanny) मदत घेतली जाते. पण असं करण्यापूर्वी ज्यांच्या ताब्यात आपण आपलं बाळ देतो आहोत, त्यांची संपूर्ण चौकशी केलेली असणं आवश्यक आहे. आपल्या मालकाच्या 11 महिन्यांच्या मुलीचे अपहरण (Nanny Plots to Kidnap owner’s daughter) करुन तिला विकण्याचा कट रचणाऱ्या एका नॅनीला अहमदाबादमधून (Nanny Arrested in Ahmedabad) अटक करण्यात आली आहे. बंगाल पोलीस आणि गुजरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा कट उधळला गेला. टाइम्स नाऊ न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. रणजित गोगोई (नाव बदललं आहे) हे मूळचे आसामचे रहिवासी आहेत. ते एका आयटी फर्मचे मालक आहेत आणि कामानिमित्त अहमदाबादमध्ये राहत होते. आपल्या 11 महिन्यांच्या मुलीची देखभाल करण्यासाठी त्यांनी बिंदू शर्मा (Nanny arrested) यांना कामावर ठेवलं होतं. बिंदू या मूळच्या पश्चिम बंगालच्या रहिवासी आहेत. बिंदूनेच गोगोई यांच्या मुलीचे अपहरण करुन, तिला विकण्याचा कट (Nanny plots kidnapping daughter) रचला होता. 200च्या नोटेपासून बनवल्या 2000च्या हुबेहूब नोटा; पण याठिकाणी टॅलेंटनं खाल्ला मार अहमदाबादमधील झोन २ चे डीसीपी विजय पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिंदू या प्रशांत कांबळे नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होत्या. पुण्यात राहणाऱ्या प्रशांतने बिंदूला नकली दत्तक कागदपत्रे बनण्यासाठी (Nanny plots kidnapping baby) मदत केली होती. बिंदूच या मुलीची आई असल्याचे या कागदपत्रांच्या आधारे म्हणण्यात आले होते. तसेच, प्रशांतने पुण्यामध्ये एक बंगाली दाम्पत्यही शोधले होते, ज्यांना मूल दत्तक हवं होतं. बिंदूने (Bengal Nanny Kidnaps baby) या दाम्पत्याची भेट घेऊन त्यांना पटवून दिलं, की गरीबीमुळे ती आपल्या मुलीचं संगोपन करू शकत नाही. त्यामुळेच ती आपल्या मुलीला दत्तक देण्यास तयार आहे. मुंबई पोलिसांना कामाला लावणाऱ्या तरुणांना अटक; बॉम्बच्या अफवेमागचं सत्य उघड यानंतर मग त्या दाम्पत्याने दत्तक घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली. मात्र, बिंदू जेव्हा मुलीची बर्थ डेट सांगू शकली नाही, तेव्हा या दाम्पत्याला तिच्यावर संशय आला. त्यामुळे त्यांनी बिंदूने जमा केलेल्या कागदपत्रांच्या आधारावरुन बंगाल पोलिसांशी संपर्क साधला. बंगाल पोलिसांनी तपास केल्यानंतर त्यांना बिंदूचा कट (Nanny tries to sell baby) लक्षात आला. त्यानंतर मंगळवारी (3 ऑगस्ट) बंगाल पोलिसांनी त्या मुलीचे वडील गोगोईंना फोन करुन परिस्थितीची कल्पना दिली. पश्चिम बंगालच्या जलपैगुडीचे डीएसपी समीर पॉल यांनी गोगोईंना बिंदू आणि त्यांच्या मुलीचा एक फोटो (Nanny Kidnap and Sell baby) पाठवला. यानंतर गोगोईंनी स्थानिक पोलिसांना संपर्क साधला. पश्चिम बंगाल पोलिसांनीही अहमदाबाद पोलिसांना याबाबत माहिती दिली होती. यानुसार कारवाई करत पोलिसांनी बुधवारी बिंदूला अटक केली. तसेच, बिंदूचा पती अमितदेखील या कटात सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Baby kidnap, Crime news, Small baby

पुढील बातम्या