निलेश पवार, प्रतिनिधी नंदुरबार, 27 जुलै : ग्रामीण भागात शेतीवरुन वाद होणे नवीन नाही. हे वाद सामोपचाराने मिटवले जातात. मात्र, कधीकधी हे वाद विकोपाला गेल्याने जीवघेणे हल्लेही होतात. अशीच एक घटना शहादा तालुक्यातील मलगाव येथे घडली आहे. शेतीच्या वादातून दोन गटात तुफान राडा झाला. यावेळी गावठी पिस्तुलाचे 2 राउंड फायर करण्यात आले. गावठी पिस्तुलातून गोळ्या झाडल्याने गोळी लागून दोघांचा मृत्यू झाला आहे. याच भांडणात तलवारीचा देखील वापर करण्यात आला. घटनेत एकूण पाचजण जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. काय आहे प्रकरण? नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मलगाव येथे शेतीच्या वादातून थेट गोळीबार झाला असून यात दोन जणांचा मृत्यु झाला असून चार जण जखमी झाले आहेत. शेती खोदण्याच्या वादातून मलगावच्या पिपलीपाडा येथे दोन परिवारांमध्ये हा वाद झाल्याचे बोलल्या जात आहे. या वादातूनच थेट गावठी कट्यांतून दोन राऊंड फायरींग करण्यात आले. यातील एकाचा गोळी लागून जागीच मृत्यु झाला तर दुसरी गोळी लागलेल्या व्यक्तिला उपचारासाठी नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. वाचा - ‘तू माझी झाली नाही तर’, लग्नाला नकार दिल्याने जोडप्यावर हल्ला, मुंब्र्याचा Video बंदुकीसोबतच या वादात तलवारीचा देखील वापर करण्यात आला आहे. तीन जण गंभीर जखमी असून यातील एकाची प्रकृती गंभीर असून यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालायात हलविण्यात आले आहे. अविनाश सुखराम खर्डे असे तीस वर्षीय मयत व्यक्तीचे नाव आहे. सुखराम खरडे या इसमाचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे. या घटनेत रायसिंग कलजी खरडे, गणेश दिवान खरडे आणि पुनीत राजेंद्र पावरा हे गंभीर जखमी झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.