मुंबई, 1 ऑगस्ट : अंधेरीत राहणाऱ्या दोन शेजारच्यांसोबत न्यूड कॉलच्या माध्यमातून 3.63 लाख रुपयांचा फ्रॉड केल्याची घटना समोर आली आहे. अंबोली पोलिसांनी या प्रकरणात एक एफआयआर दाखल केली आहे. या दोन्ही आरोपींची फसवणूक करणारी आरोपी एकच आहे की नाही, याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
पहिल्या प्रकरणात एका 86 वर्षांच्या वृद्धांची फसवणूक करण्यात आली. 28 जुलैच्या दुपारी वृद्धाच्या मोबाइवर अनोळखी व्हिडीओ कॉल आला. त्यांनी फोन रिसिव्ह केल्यानंतर लक्षात आलं की, कॉलर न्यूड होती.
आरोपीने कॉलदरम्यान वृद्धाचे फोटो क्लिक केले आणि त्याला ब्लॅकमेल करू लागली. तिने वृद्धाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी दिली. यानंतर शेवटी वृद्धाने पैसे देण्याची कबुली दिली. आरोपीने वृद्धाकडून बँक अकाऊंटमध्ये 3 लाख रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. 29 जुलै रोजी वृद्धाने अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, वृद्धाच्या शेजारी राहणाऱ्या 58 वर्षीय व्यक्तीचीही अशाच प्रकारे फसवणूक झाली आहे. त्यांनाही एका अनोळखी महिलेने व्हि़डीओ कॉल केला होता. यानंतर त्याला डिजिटल वॉलेटमधून 64 हजार रुपयांचा पेमेंट करावा लागला. अंबोली पोलिसांनी दोघांची तक्रार दाखल करून घेतली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Money fraud, Mumbai, Video call