मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

आईनं तीन मुलांना दिलं विष, चौथा गेला पळून; वाचा पुढे काय झालं...

आईनं तीन मुलांना दिलं विष, चौथा गेला पळून; वाचा पुढे काय झालं...

पतीच्या निधनानं खचलेल्या आईनं मुलांना विष देऊन स्वतः आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र एक मुलगा तिथून पळून गेल्यामुळे त्यांचा जीव वाचला.

पतीच्या निधनानं खचलेल्या आईनं मुलांना विष देऊन स्वतः आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र एक मुलगा तिथून पळून गेल्यामुळे त्यांचा जीव वाचला.

पतीच्या निधनानं खचलेल्या आईनं मुलांना विष देऊन स्वतः आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र एक मुलगा तिथून पळून गेल्यामुळे त्यांचा जीव वाचला.

  • Published by:  desk news

लखनऊ, 17 डिसेंबर : चार मुलांच्या आईनं (Mother of four children) आपल्या तीन मुलांना विष (Poison) दिलं, मात्र चौथा मुलगा पळून (Fourth child escaped) गेला. विषप्राशन केल्यामुळे आई आणि तिची तिन्ही मुलांची तब्येत बिघडली. शेजाऱ्यांनी सर्वांना जिल्हा रुग्णालयात दाखल केलं (Hospitalized) आणि तातडीनं त्यांच्यावर उपचार सुरू (Treatment) करण्यात आले. या चौघांचीही प्रकृती सध्या गंभीर असून त्यांच्यावर शर्थीचे उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

दुःखाच्या ओघात घेतलं विष

उत्तर प्रदेशमधील महू परिसरात सरोजा नावाची विधवा महिला तिच्या चार मुलांसोबत राहत होती. तीन महिन्यांपूर्वीच तिच्या पतीचं अपघाती निधन झालं होतं. पतीच्या निधनानंतर घराचा आधार तुटला आणि कमावणारी कुठलीही व्यक्ती नव्हती. अशिक्षित असल्यामुळे नोकरी नसणारी सरोजा पतीच्या विरहाने व्याकूळ होती आणि पतीच्या अचानक जाण्यामुळे खचली होती. पती नसताना संसाराचा गाडा एकटीनं कसा हाकायचा, असा प्रश्न तिला पडला होता. पदरात चार मुलं असताना त्यांचा सांभाळ, शिक्षण आणि इतर गोष्टींसाठी पैसा कुठून जमा करावा, या विवंचनेत ती होती.

आयुष्य संपवण्याचा निर्णय

पतीच्या निधनानंतर तीन महिने निराशेच्या गर्तेत असलेल्या सरोजाला आपलं आयुष्य संपवणं हाच एकमेव मार्ग आहे, असं वाटू लागलं होतं. आपल्या माघारी आपल्या मुलांचे हाल होतील आणि त्याची कल्पनाही आपल्याला सहन होणार नाही, असा विचार करून मुलांना विष देऊन स्वतः आत्महत्या कऱण्याचा निर्णय तिने घेतला.

हे वाचा- धुळ्यात एसटी कर्मचाऱ्याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू, कर्मचारी संतापले

चौथा मुलगा गेला पळून

आईनं स्वतः किटकनाशक प्यायलं आणि नंतर ते मुलांना द्यायला सुरुवात केली. पहिल्या तीन मुलांनी ते घेतलं, मात्र चौथा मुलगा तिथून पळून गेला. किटकनाशकाचा प्रभाव जाणवू लागल्यामुळे सरोजा काहीच करू शकली नाही. चौथ्या मुलाने बाहेर धाव घेत शेजाऱ्यांना याची कल्पना दिली आणि मदत करण्याचं आवाहन केलं. शेजाऱ्यांनी सर्वांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. सर्वांचा जीव वाचावा, अशीच प्रार्थना सध्या सर्व ग्रामस्थ करत आहेत.

First published:

Tags: Bihar, Crime, Poison, Woman