मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /विष प्राशन करताच मुलांची आली आठवण; लेकरांना शेवटचं पाहण्यासाठी मातेनं केलं जीवाचं रान, हृदय पिळवटणारी घटना

विष प्राशन करताच मुलांची आली आठवण; लेकरांना शेवटचं पाहण्यासाठी मातेनं केलं जीवाचं रान, हृदय पिळवटणारी घटना

(प्रातिनिधीक फोटो)

(प्रातिनिधीक फोटो)

Attempt to Suicide in Hingoli: हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातील राजदरी याठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका महिलेनं पतीच्या त्रासाला कंटाळून विष प्राशन केलं होतं. पण शेवटच्या क्षणी मुलांची आठवण आल्यानं तिने लेकरांना भेटण्यासाठी जीवाचं रान केलं आहे.

पुढे वाचा ...

औंढा, 10 मार्च: हिंगोली (Hingoli) जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातील राजदरी याठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका महिलेनं पतीच्या मारहाणीला कंटाळून विष प्राशन करत आत्महत्येचा प्रयत्न (Mother attempt to commit suicide by drink poison) केला होता. पण विष प्राशन करताच त्यांना अचानक आश्रमशाळेत शिकणाऱ्या आपल्या मुलांची आठवण येऊ लागली. त्यामुळे त्यांनी अखेरच्या वेळी मुलांना पाहण्यासाठी विष प्राशन केल्याच्या स्थितीत पायपीट करत मुलांची शाळा (Went ashram school to meet children for last time)गाठली. आईची अवस्था पाहून मुलांनी ओक्साबोक्सी रडायला सुरुवात केली.

हा प्रकार शाळेच्या मुख्याध्यापकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने प्रसंगावधान दाखवत काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीनं महिलेला उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केलं. याठिकाणी प्राथमिक उपचार घेतल्यानंतर रुग्णवाहिका बोलावून त्यांना पुढील उपचारासाठी औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. याठिकाणी त्यांच्यावर उपचार केले जात असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा-बहिणीच्या लग्नाआधीच नियतीनं साधला डाव, नाशकात शेतकरी भावाचा तडफडून अंत

सुवर्णमाला बोचरे असं संबंधित महिलेचं नाव असून त्या औंढा नागनाथ तालुक्यातील राजदरी येथील रहिवासी आहेत. त्यांचे पती त्यांना नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणातून मारहाण करतात. घटनेच्या दिवशी बुधवारी देखील सुवर्णमाला यांना त्यांच्या पतीनं मारहाण केली होती. त्यामुळे पतीच्या त्रासाला कंटाळून सुवर्णमाला यांनी बुधवारी सकाळी विष प्राशन केलं. पण विष प्राशन केल्यानंतर अचानक त्यांना आपल्या मुलांची आठवण येऊ लागली. मुलांना शेवटचं पाहण्यासाठी त्यांनी दोन किलोमीटर पायी चालत पिंपळदरी येथील आश्रम शाळेत गेल्या.

हेही वाचा-धमकी देत स्वत:च्या मृत्यूला दिलं आमंत्रण; राजापुरात महिलेनं तरुणाला दगडानं ठेचलं

याठिकाणी गेल्यानंतर त्यांनी आपल्या तिन्ही मुलांची भेट घेतली. तसेच मी विष घेतलं असून मी आता मरणार आहे, असंही त्यांनी आपल्या मुलांना सांगितलं. हा प्रकार कळाल्यानंतर तिन्ही मुलांनी आईला बिलगून ओक्साबोक्शी रडायला सुरुवात केली. याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक हनुमंत बचाटे यांना मिळाली. त्यांनी त्वरित याची माहिती सामाजिक कार्यकर्ते बापूराव घोंगडे यांना दिली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या काही मित्रांना घेऊन पिंपरदरीची शाळा गाठली. अखेरच्या घटका मोजणाऱ्या सुवर्णमाला यांना रुग्णालयात दाखल केलं. सध्या सुवर्णमाला यांच्यावर औंढा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार केले जात असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime news, Suicide attempt