पाचोरा, 04 मार्च: भारतीय समाजात मुलगा म्हणजे वंशाचा दिवा तर मुलगी म्हणजे घराची इज्जत मानली जाते. अशात मुलीनं आपल्या आई-वडिलांच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केला किंवा पळून गेली, तर थेट कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का बसतो. अशा परिस्थितीत अनेकदा ऑनर किलिंगसारख्या घटना घडतात. तर काहीवेळा समाजात झालेल्या नाच्चकीला घाबरुन स्वत:च्या जीवाचं बरं-वाईट करतात. अशीच एक घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा (Pachora) याठिकाणी घडली आहे. मुलगी पळून गेल्याचं दु:ख सहन न झाल्याच्या कारणातून येथील एका महिलेनं विष प्राशन करून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न (mother attempt to commit suicide by drinking poison) केला आहे. पण पीडित महिलेनं विष प्राशन केल्यानंतर त्वरित नातेवाईकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. पण त्यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. संबंधित घटना पाचोरा तालुक्यातील गाळण गावात घडली आहे. हेही वाचा- पोलीस व्हायचं स्वप्न बाळगलं पण परिस्थितीनं केला घात, साताऱ्यात तरुणीचा भयावह अंत मिळालेल्या माहितीनुसार, गाळण गावातील रहिवासी असणाऱ्या संबंधित महिलेची मुलगी घरातून पळून गेली होती. लेक पळून गेल्याचं समजताच आईला मोठा धक्का बसला. यातून त्यांना सावरता न आल्याने बुधवारी त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. विष प्राशन केल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्यांना तातडीनं स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. याठिकाणी त्यांच्यावर उपचार केले जात असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. हेही वाचा- खून करून महिलेचा मृतदेह जमिनीत गाडला; 4महिन्यांनी उलगडलं गूढ, बीडमधील थरारक घटना दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी मुंबईला पळून गेलेल्या तरुणाला परत आणलं आहे. पोलिसांनी तिला आईच्या स्वाधीन केलं असून घटनेचा पुढील तपास केला आहे. संबंधित मुलगी घरातून नेमकी का गेली होती? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नसून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.