जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Delhi Crime : सैतान प्रियकराचे प्रेयसीवर सपासप 16 वार, पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहून पोलीसही धक्क्यात

Delhi Crime : सैतान प्रियकराचे प्रेयसीवर सपासप 16 वार, पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाहून पोलीसही धक्क्यात

दिल्ली पुन्हा हादरली, प्रियकराचे अल्पवयीन प्रेयसीवर सपासप वार

दिल्ली पुन्हा हादरली, प्रियकराचे अल्पवयीन प्रेयसीवर सपासप वार

देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा क्राईम कॅपिटल म्हणून चर्चेत आली आहे, त्याला कारण ठरलंय दिल्लीच्या शाहबाद डेरीमधील सैतानी हत्याकांड.

  • -MIN READ Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 29 मे : देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा क्राईम कॅपिटल म्हणून चर्चेत आली आहे, त्याला कारण ठरलंय दिल्लीच्या शाहबाद डेरीमधील सैतानी हत्याकांड. 20 वर्षीय विकृतानं अवघ्या 16 वर्षीय मुलीची निर्दयीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रात्री साडेआठच्या सुमारास साहिल नावाच्या आरोपीने, अल्पवयीन मुलीला अनेकदा चाकूने भोसकले आणि त्यानंतर खाली पडलेल्या मुलीला भल्यामोठ्या दगडाने ठेचले. साहिलचं हे कृत्य सुरू असताना, परिसरातील लोकं मात्र बघ्याच्या भूमिकेत पाहायला मिळाले. एकहीजण त्या मुलीच्या बचावासाठी पुढे आलं नाही. या थरारक हत्याकांडाचा धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय. या प्रकरणी आरोपी असलेल्या साहिलची त्या अल्पवयीन मुलीशी ओळख होती. साहिलचे त्या मुलीशी प्रेमसंबंध होते, रविवारी त्या दोघांमध्ये भांडण झालं होतं. साहिल फ्रिज दुरुस्तीचं काम करतो. ती मुलगी मित्राच्या घरी जात होती, पण वाटेतच साहिलने तिचा खून केला. 90 सेकंदांपर्यंत साहिल या मुलीवर हल्ला करत खून केल्यानंतर आरोपी साहिल फरार झाला होता. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधून त्याला अटक करण्यात आली आहे. साहिलने या मुलीवर एका पाठोपाठ एक असे चाकूने 16 वार केले तसंच डोक्यामध्ये दगडही घातला. या हल्ल्यामुळे मुलीची खोपडीही फुटली होती, असं पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात