उमरगा, 16 फेब्रुवारी: अल्पवयीन मुलांचा बालविवाह लावून देणं कायद्यानं गुन्हा आहे. असं असूनही ग्रामीण भागात अनेक ठिकाणी सर्रासपणे बालविवाह केला जातो. कुणी तक्रार दाखल केली तर पोलिसांकडून कारवाई केली जाते. पण बऱ्याचदा बालविवाहाची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे लोकांमध्ये देखील कायद्याची भीती फारशी उरली नाही. असं असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा येथील एका अल्पवयीन मुलीनं स्वत: पोलिसांना फोन करून आपला बालविवाह रोखला आहे. बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, अल्पवयीन मुलींचा बालविवाह रोखला आहे. तसेच पोलिसांनी पीडित मुलीच्या आई वडिलांना कायद्याची माहिती देत त्याचं समुपदेशन केलं आहे. तसेच मुलीच्या वडिलांनी लेखी स्वरुपात लिहून देत विवाह थांबवण्याचं मान्य केलं आहे. पण पीडित मुलीनं दाखवलेलं धाडस पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे. शिवाय बालविवाह रोखण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी पीडित मुलीचं शैक्षणिक पालकत्वही स्वीकारलं आहे. हेही वाचा- कर्ज वसुलीसाठी कंपनीचं घृणास्पद कृत्य; अश्लील फोटो VIRAL होताच तरुणानं दिला जीव मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील कदेर येथील रहिवासी असणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीचं लग्न तिच्या पालकांनी निश्चित केलं होतं. आपलं लग्न होणार असल्याची माहिती मिळताच पीडित मुलीनं उमारगा पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिली. बालविवाहाची माहिती मिळताच सोमवारी (14 फेब्रुवारी) पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली. पोलिसांनी तातडीने या घटनेची माहिती जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीच्या पथकाला दिली. हेही वाचा- धक्कादायक! पुण्यात प्रसिद्ध बिल्डरकडून तरुणीवर बलात्कार;डेक्कन पोलिसांत FIR दाखल संबंधित पथकानं मिळालेल्या माहितीची शहानिशा केल्यानंतर, माहितीत तथ्य असल्याचं समजलं. त्यानंतर जिल्हा बालविवाह प्रतिबंध समितीच्या पथकासह उमारगा पोलिसांनी पीडितेच्या गावात धाव घेतली. त्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांना कायद्याची माहिती देऊन त्याचं समुपदेशन केलं. तसेच विवाह थांबवण्याचं मान्य केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्याकडून लेखी स्वरुपात लिहून घेतलं आहे. पीडित मुलीनं स्वत:चा बालविवाह रोखण्यासाठी केलेलं धाडस पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.