जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / जीममधील मैत्रीनं केला घात, बिल्डरच्या पत्नीवर नेमकं गोळ्या कुणी झाडल्या?

जीममधील मैत्रीनं केला घात, बिल्डरच्या पत्नीवर नेमकं गोळ्या कुणी झाडल्या?

हत्याकांडनं हादरलं दिल्ली

हत्याकांडनं हादरलं दिल्ली

जीममधील मैत्रीनं केला घात, बिल्डरच्या पत्नीसोबत घडला धक्कादायक प्रकार

  • -MIN READ Delhi,Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 जुलै : बिल्डरच्या पत्नीला संपवलं आणि त्यानंतर स्वत: आयुष्य संपवलं आहे. दोघांचे मृतदेह मिळाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एवढंच नाही तर समोर आलेली माहिती हादरवणारी आहे. बिल्डरची पत्नी आणि आरोपी दोघंही गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना ओळखत होते. ते सोबत जीमसाठी जात होते. मात्र अचानक असं काय घडलं की त्याने बिल्डरच्या पत्नीला संपवलं? दिल्लीतील द्वारका परिसरात आरोपीने बिल्डरच्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. महिलेवर तिच्या घराबाहेर गोळ्या घालण्यात आल्या. दोघेही एकमेकांना आधीच ओळखत होते. ही घटना 27 जुलै रोजी रात्री घडल्याचं सांगितलं जात आहे. ही हत्या बदला घेण्याच्या हेतूनं की प्रेमप्रकरण नेमकी कोणत्या उद्देशानं करण्यात आली याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले असून घटनास्थळावर तपास करत आहेत.

News18लोकमत
News18लोकमत

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीममध्ये दोघांची मैत्री झाली होती. रेनू यांचे पती प्रॉपर्टीची कामं करतात. नेमकी ही हत्या कशामुळे करण्यात आली याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. यामागे बदला घेण्याची भावना होती की प्रेमप्रकरण होतं याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात