जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Meera Road Murder: 'सरस्वतीची हत्या मी नाही तर..' मनोजच्या कबुलीमुळे पोलिसांचाही गोंधळ! बचावासाठी रचला नवा डाव?

Meera Road Murder: 'सरस्वतीची हत्या मी नाही तर..' मनोजच्या कबुलीमुळे पोलिसांचाही गोंधळ! बचावासाठी रचला नवा डाव?

मनोजच्या कबुलीमुळे पोलिसांचाही गोंधळ!

मनोजच्या कबुलीमुळे पोलिसांचाही गोंधळ!

Meera Road Murder Case: मुंबईतील मीरा रोड खून प्रकरणातील पोलिसांनी 56 वर्षीय मनोज साने याच्या घरातून मृतदेहाचे तुकडे जप्त केले आहेत. मनोजने लिव्ह इन पार्टनर 36 वर्षीय सरस्वती वैद्य यांची हत्या केल्याचा आरोप आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 12 जून : मुंबईतील मीरा रोड हत्याकांडातील आरोपी मनोज साने याने आपली लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्य यांच्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. मी सरस्वतीची हत्या केली नसल्याची बतावणी मनोजने केली आहे. सरस्वतीने विष पिऊन आत्महत्या केली आहे. पोलिसांची कारवाई टाळण्यासाठी त्याने सरस्वतीच्या शरीराचे तुकडे केल्याचे सांगितले. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मनोजने सांगितले की, सरस्वतीला मृत पाहून तो खूप घाबरला होता आणि त्याला अटक होण्याची भीती वाटू लागली होती. आरोपीचा बनाव? रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, 56 वर्षीय मनोजने पोलिसांसमोर जबाब दिला आहे की, 3 जून रोजी सकाळी जेव्हा तो घरी आला तेव्हा त्याने सरस्वती जमिनीवर पडलेली पाहिली. तोंडातून फेस येत आहे. मृत्यूची खात्री झाल्यानंतर, त्याने एक झाड कापण्याचे यंत्र विकत घेतले आणि सरस्वतीच्या शरीराचे लहान तुकडे केले. यासोबतच हे तुकडे कुकरमध्ये उकळून गॅसवर भाजून घेतले. मृतदेहाची सहज विल्हेवाट लावणे हाच त्याचा यामागचा हेतू होता. घरातून दुर्गंधी येत असल्याने खून झाल्याचे उघड हे संपूर्ण प्रकरण 7 जून रोजी समोर आले होते. सोमवारपासून म्हणजे 5 जूनपासून शेजारच्या लोकांना फ्लॅटच्या आतून दुर्गंधी येऊ लागली होती. मनोजच्या शेजाऱ्याने दरवाजा ठोठावला असता त्याने तो उघडला नाही. आतून कटर चालल्याचा आवाज येत होता. एके दिवशी शेजाऱ्याने त्याला आत काय चाललंय हे विचारण्यासाठी थांबवलं. मात्र, काही महत्त्वाचे काम आहे असे सांगून तो तिथून निघून गेला. दुर्गंधी सातत्याने वाढत होती, हे पाहून सोसायटीच्या व्यवस्थापनाने पोलिसांना कळवले. वाचा - सरस्वतीचा खुनी मनोज साने कोट्यवधींच्या मालमत्तेचा मालक; दिवसभर असायचा नशेत मनोजवर श्रद्धा खून प्रकरणाचा प्रभाव होता त्यानंतर मनोजच्या घराचा दरवाजा उघडण्यात आला. कुकरमध्ये सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आले. या संपूर्ण प्रकरणावर डीसीपी जयंत बजबळे म्हणाले की, मनोजवर दिल्लीतील श्रद्धा वालकर खून प्रकरणाचा प्रभाव होता. लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याने श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि जंगलात फेकून दिले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात