Home /News /crime /

फ्रॉडचा वेगळाच स्तर; MCA च्या विद्यार्थ्याने डिलिव्हरी बॉयसोबत Flipkart ला लावला चुना

फ्रॉडचा वेगळाच स्तर; MCA च्या विद्यार्थ्याने डिलिव्हरी बॉयसोबत Flipkart ला लावला चुना

दोन वर्षांपर्यंत Flipkart कंपनीला याबाबत जराही शंका आली नव्हती.

    जयपूर, 8 जानेवारी : महागडे फोन ऑनलाइन ऑर्डर (Online Fraud) करून फसवणूक करणाऱ्या दोन आरोपींना सायबर पोलिसांनी अटक केली आहे. यातील एका मास्टर माइंडला 5 जानेवारी अटक करण्यात आली होती. तर यात सामील डिलिव्हरी बॉयला (online order) शुक्रवार अटक करण्यात आली आहे. दोघांच्या अटकेनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केला. पोलिसांनी सांगितलं की, मास्टर माइंड MCA विद्यार्थी आहे. तो BMW बाइकचा चाहता आहे. सध्या तो राजस्थान विद्यापीठात शिक्षण घेत आहे. आरोपी 2 वर्षांपासून डिलिव्हरी बॉयसोबत मिळून ऑनलाइन शॉपिंग कंपनी फ्लिपकार्टसोबत (Flipkart fraud) लाखो रुपय़ांचा फ्रॉड केला आहे. वेगवेगळ्या नाव आणि पत्त्यावर मागवायचा आयफोन साइबर टीमचे (Cyber Team) प्रमुख सतीश चंद्र यांनी सांगितलं की, दोन वर्षांपूर्वी फ्लिपकार्ट कंपनी जयपुरच्या हब इंचार्जने फ्रॉडचा प्रकार दाखल केला आहे. कंपनीकडून सांगण्यात आलं होतं की, एका व्यक्तीकडून विविध नाव आणि पत्त्यावर महागडे आयफोन ऑर्डरकेला जातात. या सर्वांचे पेमेंटदेखील ऑनलाइन केले जातात. मात्र डिलिव्हरी बॉयसोबत खोटेपणाकरीत आयफोनच्या ऐवजी तुटलेल्या जुन्या वस्तू टाकून ऑर्डर रद्द करीत आहे. या प्रकरणात तपास केल्यानंतर बँक अकाऊंटची माहिती मिळाली. पोलिसांनी या रजिस्टर्ड नंबरवर संपर्क साधला तर सर्व नंबर बंद होते. यानंतर पोलिसांनी बँकेकडून माहिती गोळा केली. तेव्हा या अकाऊंटवर नवीन नंबर रजिस्टर्ड झाल्याचं कळालं. नंबरच्या आधारावर पोलिसांनी एमसीएचा विद्यार्थी अशोक मीणा (22) याला अटक केली. यानंतर पोलिसांनी शुक्रवारी फ्लिपकार्ट कंपनीचे डिलीवरी बॉय फहीमुद्दीन ( 26) यालाही ताब्यात घेतलं. अशोक मीणा हा चांगल्या कुटुंबातील आहे. तो राजस्थान यूनिवर्सिटीमधून एमसीए करीत आहे. आरोपीजवळ लाखोंची BMW बाइक आहे. जी फायनेंन्सवर खरेदी करण्यात आली होती. मजा-मस्तीमध्ये त्याने ही फसवणूक केल्याचं सांगितलं. हे ही वाचा-पाकमधील बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी प्रेयसीचा प्रताप, बॉर्डर क्रॉस करण्याच्या तयारीत दोन वर्षांपूर्वी डिलिव्हरी बॉयच्या आला होता संपर्कात.. डिलिव्हरी बॉय आणि अशोकची ओळख दोन वर्षांपूर्वी झाली होती. अशोकने एक टी-शर्ट मागवला होता. त्यावेळी फहीमुद्दीन आला होता. अशोकने डिलिव्हरी बॉयला आपला प्लान सांगितला. यानंतर अशोक वेगवेगळ्या नंबर आणि पत्त्यावरुन महागडे आयफोड ऑर्डप कर त्याचा ऑनलाइन पेमेंट करीत होता. डिलिव्हरी झाल्यानंतर त्यातून फोन काढून घेत आणि त्याऐवजी जुन्या वस्तू टाकून पार्सल परत करीत होता. कस्टरने याला रिजेक्ट केल्याचं सांगून हबमध्ये जमा करीत होता. यानंतर कंपनी खात्यात पुन्हा पेमेंट करीत होती. मात्र जेव्हा हबमध्ये या पार्सलचा तपास होत तेव्हा त्यात फोन नसे. आरोपीने दोन वर्षात 1 लाखांचे 5 आयफोन मागवले आहेत. हे फोन तो बाजारात विकत होता.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Financial fraud, Flipkart fraud

    पुढील बातम्या