रांची, 29 नोव्हेंबर: अगोदर लग्नाला नकार आणि त्यानंतर पुन्हा यू-टर्न घेत होकार दिल्यामुळे उद्भवलेली परिस्थिती (Man dies in heart attack during marriage panchayat) निस्तारताना मुलीच्या नातेवाईकाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तरुण आणि तरुणी दोघेही (Rejection after selection) सुरुवातीला लग्नाला तयार झाले, काही विधीही पार पडले. मात्र त्यानंतर तरुणने लग्नाला नकार दिला. मग पुन्हा मुलीचं मनपरिवर्तन झालं. या प्रकारात दोन्हीकडच्या घरच्यांमधील वाद सोडवण्यासाठी बसलेल्या पंचायतीत मुलीच्या नातेवाईकाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.
काय आहे प्रकार?
झारखंडमधील हिरोडिहमध्ये राहणाऱ्या जोंगी नावाच्या तरुणाचं एका तरुणीसोबत लग्न ठरलं होतं. जोंगी हा पेशानं इंजिनिअर असून ओडिशात नोकरी करायचा. 10 जुलै या दिवशी धर्मशाळा येथे दोघांचा साखरपुडा झाला होता. एकमेकांना तिलक लावत त्यांनी लग्न करण्याचा संकल्प केला होता. त्यानंतर 29 डिसेंबर हा मुहूर्त लग्नासाठी निश्चित करण्यात आला होता. दोघांनही आपापल्या नातेवाईकांसोबत लग्नाची तयारी सुरू केली होती. शॉपिंगपासून आमंत्रण देण्यापर्यंत सगळी तयारी झाली होती. मात्र त्याच काळात तरुणीनं हे लग्न न करण्याचा निर्णय घेतला.
तरुणाला सांगितला निर्णय
आपल्याला लग्न करण्याची इच्छा नसल्याचं तरुणीनं त्याला सांगितलं. हे लग्न रद्द करण्याची विनंती केली. मग तरुणानेही तिच्या इच्छेचा विचार करत हे लग्न मोडण्याचा निर्णय़ घेतला. मात्र काहीच दिवसात तिने पुन्हा फेसबुकवरून त्याच्याशी संपर्क सधला आणि आपल्याला लग्न करण्याची इच्छा असल्याचं सांगितलं.
मात्र या प्रकारामुळे तरुण चिडला आणि त्याने तरुणीशी लग्न करण्याची इच्छा नसल्याचं सांगितलं. त्यामुळे तरुणी आणि तिचे नातेवाईक थेट पोलीस ठाण्यात गेले आणि लग्न ठरवून ते मोडत असल्याची तक्रार दिली.
हे वाचा- चिंता वाढवणारी बातमी, एकाच शाळेच्या 43 विद्यार्थींनींना कोरोना
पंचायतीत हार्ट अटॅक
याच मुद्द्यावर चर्चा करून तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूच्या गावकऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत तरुण आणि तरुणीच्या लग्नाचा विषय सुरू असतानाच एका ज्येष्ठ नागरिकाला हार्ट अटॅक आल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Heart Attack, Marriage, Ranchi