3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा, तब्बल तीन वर्षांनी मिळाला न्याय

3 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा, तब्बल तीन वर्षांनी मिळाला न्याय

Bihar Rape Case: 2 जून 2018 मध्ये बिहारमधील (Bihar) एका 3 वर्षाच्या निष्पाप मुलीवर एका व्यक्तीनं बलात्कार (Rape) केला होता. बलात्कारानंतर त्यानं तिची निर्दयी हत्याही (Murder) केली होती.

  • Share this:

समस्तीपूर, 20 डिसेंबर: देशामध्ये दिवसागणिक महिलांविरोधातील गुन्ह्यांची (Crime against women) संख्या वाढतच चालली आहे. NCRB च्या आकडेवारीनुसार देशात दिवसाला 87 महिलांवर बलात्कार (rape) होतात. यामध्ये अगदी नवजात बालकांपासून 50 वर्षांच्या महिला आहेत. सर्वच वयोगटातील महिलांवरील अत्याचाराच्या (Tourture) घटना देशात वाढत आहेत. अशा प्रवृत्तींना आळा घालण्याच्या दृष्टीने महत्त्वाची बातमी समोर आली. तीन वर्षापूर्वी एका चिमुकलीवर बलात्कार (Rape) करून तिची हत्या करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा (Death Sentence) सुनावण्यात आली आहे.

2 जून 2018 मध्ये बिहारमधील (Bihar) 3 वर्षाच्या निष्पाप मुलीवर एका व्यक्तीनं बलात्कार केला होता. बलात्कारानंतर त्यानं तिची निर्दयी हत्याही केली होती. याप्रकरणी न्यायालयाने पोक्सो कायद्याअंतर्गत आरोपी रामलाल मेहतो याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही घटना समस्तीपूर जिल्ह्याशी येथील आहे. तब्बल तीन वर्षांनी या चिमुकलीला न्याय मिळाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रामलाल महतो यानं 3 वर्षांच्या निरागस मुलीवर बलात्कार करून तिचा खून केला होता आणि त्यानंतर मृतदेह शेतात फेकला होता. ही चिमुकली आपल्या आजीच्या गावी काही दिवसांसाठी राहायला आली होती. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी या संदर्भात दलसिंहसराय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पीडितेचं कुटुंब उजियारपूर येथील आहे.

बलात्कार आणि हत्येप्रकरणी न्यायालयानं रामलाल महतो याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. सदर आरोपी दलसिंहसराय नजीकच्या बसरिया गावचा रहिवाशी आहे. 2 जून 2018 रोजी बलात्कार करून हत्या केल्यानंतर अडीच वर्षांनी न्यायालयानं हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. विशेष न्यायाधीशांनी दोषी आढळलेल्या रामलालला कलम 376, 302 आणि 6 पोक्सो कायद्यांतर्गत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Published by: News18 Desk
First published: December 20, 2020, 7:46 PM IST

ताज्या बातम्या