अहमदाबाद : कृष्णानगर येथील पोलिसांनी दारूची तस्करी करणाऱ्या चार तरुणींना ताब्यात घेतलं आहे. या हाई प्रोफाइल तरुणींना 214 बियर टीनसह ट्रेनमधून अटक करण्यात आली आहे. या चौघी महाराष्ट्रातील असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या बॅगेट बियरच्या टीन होत्या. विशेष म्हणजे या तरुणी वेगवेगळ्या डब्यात चढल्या होत्या. या चौघी अहमदाबादला येऊन तस्कऱ्यांना बियरचे टीन देतात. प्रवासादरम्यान त्या एकमेकींशी बातचीतदेखील करीत असतं.
कृष्णानगर पोलीस ठाण्याचे पीआय एजे चौहान यांच्या टीमला याबाबत अलर्ट करण्यात आलं होतं. महाराष्ट्रातील काही तरुणी नरोदा भागातून मोठ्या प्रमाणात विदेशी दारू घेऊन येत असल्याची सूचना पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी चारही तरुणींच्या बॅगेचा तपास केला, त्यावेळी तरुणींच्या बॅगेतून मोठ्या संख्येत बियरचे टीन सापडले.
कृष्णानगर पोलिसांनी महाराष्ट्रातील विविध भागात राहणाऱ्या लक्ष्मी माछरे, पूर्णिमा भट, पूजा तमोचीकर आणि सुनीता तिडगे यांना 214 टीन बिअरसह अटक केली आहे. या तरुणी कुबेरनगर येथे राहणाऱ्या बुटलेगर तेजस ताम्चे याला बिअरच्या टीन पोहोचवणार होत्या.
कृष्णानगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक चौहान यांनी सांगितलं की, महाराष्ट्रातील चार तरुणी शॉर्टकटमध्ये पैसे कमविण्यासाठी दारूची तस्करी करीत होती. या तरुणी बिअरचे टीन वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरून ट्रेनमध्ये बसत होत्या.
ट्रेनच्या प्रवासादरम्यान त्या एकमेकींशी बोलत नव्हत्या आणि अहमदाबाद आल्यानंतर रिक्षात एकत्र बसत होत्या. अहमदाबादमध्ये यापूर्वीही चार तरुणींनी दारूची तस्करी केल्याचं समोर आलं आहे. सध्या या चौघींविरोधात तपास सुरू करण्यात आला आहे.