इंदूर, 04 एप्रिल: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) इंदूर जिल्ह्यात (Indore district) एक खळबळजनक घटना घडली आहे. विवाहित व्यावसायिकाच्या प्रेमातून एका तरुणीने (young girl commits suicide) आत्महत्या केली. तिनं आधी हाताच्या नसा कापल्या आणि नंतर रक्तानं सुसाईड नोट (suicide note) लिहिली. त्यानंतर तिनं गळफास लावून आत्महत्या केली. संध्याकाळी आई घरी परतली असता, तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली तेव्हा ही घटना उघडकीस आली. त्यानंतर बेशुद्ध झालेल्या आईने आरडाओरडा सुरू केला आणि तिने तरुणीला रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या प्रकरणी पोलिसांना एका पानाची सुसाईड नोट सापडली आहे.
पोलिसांना सापडलेल्या या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे- जिवंतपणी मी तुझी होऊ शकली नाही. मेल्यानंतर तुझा हक्क आहे. माझे आई-बाबा खूप छान आहेत. माझा धाकटा भाऊ धीरज माझ्यावर खूप प्रेम करतो. दीपकचे आधीच लग्न झालेले आहे. मला तुझ्याशी लग्न करायचं होतं. मी तुझी होऊ शकले नाही. मी स्वतःच्या इच्छेनं आत्महत्या करत आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे दीपक.
मानेवर आणि हातावर जखमा
TI संजय शुक्ला यांनी सांगितलं की, शिवानी छतर सिंग तोमर असे 23 वर्षीय मृत तरुणीचं नाव आहे. ती नागीन नगर येथे राहत होती. शनिवारी संध्याकाळी तिचा मृतदेह घरात पडलेला आढळून आला. तरुणीच्या मानेवर आणि हातावर ब्लेडच्या खुणा आहेत. या खुणांसोबतच पोलिसांना मानेवर फासाच्या खुणाही आढळून आल्या आहेत. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या व्यावसायिकासाठी तरुणीने आत्महत्या केली आहे, तो आधीच विवाहित आहे. त्याची पत्नी 20 दिवसांपूर्वी शिवानीच्या घरी येऊन वाद घालून गेली होती.
मृतदेह पाहून आईची उडाली झोप
मृताची आई राणीबाई लोकांच्या घरी जेवण बनवते. सकाळपर्यंत सगळं ठीक होतं. संध्याकाळी राणी घरी पोहोचल्या तेव्हा त्यांना शॉक बसला. मुलीचा मृतदेह त्यांनी पाहिला. शनिवारी दुपारी चार वाजेपर्यंत कॉलनीतील लोकांनी शिवानीला पाहिलं होतं. त्यानंतर ती घरी गेली आणि बाहेर आली नाही. शिवानीचे वडील एका खासगी कंपनीत आणि भाऊ धीरज हॉस्पिटलमध्ये काम करतो.
कुटुंबीयांनी लावला हत्येचा आरोप
शिवानीच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, दीड महिन्यांपूर्वीच तीचं लग्न ठरलं होतं. लवकरच तिच्या साखरपुड्याची तारीखही ठरणार होती. यावर शिवानीही खूश होती. आता मुलीच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी व्यावसायिकावर हत्येचा आरोप केला आहे. तिच्या घराचा पुढचा दरवाजा असा आहे की तो कोणीही उघडू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Madhya pradesh, Sucide attempt