रांची, 11 ऑगस्ट : झारखंडची राजधानी रांचीमधून आत्महत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे 26 वर्षीय महिलेने बुधवारी आपल्या खोलीतून दारावर लिपस्टिकने सुसाइड नोट लिहिली आणि यानंतर घरातच गळफास घेतला. महिलेचं नाव चंदादेवी असून तिला दोन मुलंही आहेत. पतीला त्रासाला कंटाळून महिलेने धक्कादायक पाऊल उचललं.
घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत होती महिला...
चंदाने 2019 मध्ये दिलीपसोबत प्रेमविवाह केला होता. लग्नानंतर चंदाला तिचे पती आणि सासरच्या मंडळींकडून सातत्याने हुंड्यासाठी त्रास दिला जात होता. चंदाच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याच्या सासरच्यांविरोधात गंभीर आरोप केले आहेत.
रक्षाबंधनाच्या 2 दिवस आधी भावाकडून बहिणीची हत्या; तिचं गच्चीवर फिरणं आवडत नव्हतं म्हणून...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी एका महिलेने आपल्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस घरी पोहोचले तेव्हा भिंतीवर लिपस्टिकचा वापर करुन तिला होणारा त्रास कथन केला होता. याशिवाय पती आणि सासरच्या मंडळींची नावं लिहिली होती.
यात तिने लिहिलं की, सतत मारहाण आणि त्रासामुळे ती वैतागली आहे. तिच्या मृत्यूनंतर पतीला तिच्या मृतदेहाला स्पर्श करण्याची परवानगी दिली जाऊ नये. या सर्व प्रकारानंतर चंदाच्या कुटुंबीयांनी FIR दाखल केली आहे. चंदाच्या पतीला दुसरं लग्न करायचं होतं. पतीचा मित्र, नणंद आणि सासूदेखील त्याला यासाठी जबरदस्ती करीत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Jharkhand, Suicide