लखनऊ, 13 एप्रिल : जवळपास चार दशके, उत्तरप्रदेशच्या राजकारणावर आणि जरायमच्या जगावर राज्य करणाऱ्या अतिक अहमद याचे साम्राज्य आता जवळपास नष्ट झाले आहे. एकेकाळी अतिक अहमद आणि त्याचे कुटुंबीय यांचा फार वर्चस्व होते. पण आज त्या कुटुंबीतील काही सदस्य तुरुंगात आहेत किंवा फरार आहेत. माफिया अतिक अहमदला गुरुवारी सर्वात मोठा धक्का बसला, जेव्हा त्याचा तिसरा मुलगा असद अहमद झाशीच्या बाबिनाजवळ पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ठार झाला. आतापर्यंत लोकांची हत्या करणाऱ्या अतिक अहमदसाठी हा सर्वात मोठा धक्का आहे, कारण त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची अशाप्रकारे मृत्यूची ही पहिलीच घटना आहे.
अतिक अहमद याला पाच मुले आहेत. उमर आणि अली ही दोन मुले खंडणी आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तुरुंगात आहेत. उमेश पाल हत्येप्रकरणी पाच लाखांचे बक्षीस असलेला एक मुलगा असद हा चकमकीत ठार झाला आहे. तर दोन अल्पवयीन मुले बाल संरक्षण गृहात आहेत. तसेच उमेश पाल खून प्रकरणात पत्नी शाइस्ता परवीनचेही नाव आहे. तिच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले असून ती फरार आहे. तसेच त्याचा भाऊ अश्रफ सुद्धा बरेली तुरुंगात बंद आहे. माफिया अतीक अहमदच्या मुलाचा द एण्ड, एन्काऊंटरनंतर योगींची पहिली प्रतिक्रिया याशिवाय बहीण आयशा नूरी आणि तिच्या दोन मुलींनाही आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी त्याच्या बहिणीचा नवरा डॉ.अखलाक याला अटक करून तुरुंगात टाकले आहे. उमेश पाल हत्येप्रकरणी भावाची पत्नी झैनब फातिमा हिलाही आरोपी करण्यात आले आहे. अशा प्रकारे अतिक अहमदचे संपूर्ण कुटुंबच आता गुन्हेगार घोषित करण्यात आले आहे. उमेश पाल खून प्रकरणातील तीन शूटर अद्याप फरार - दुसरीकडे उमेश पाल खून प्रकरणाबाबत बोलताना पोलीस आणि एसटीएफने अतिकच्या मुलासह चार जणांना चकमकीत ठार केले आहे. तर सध्या अरमान, गुड्डू मुस्लिम आणि साबीर फरार आहेत. तसेच तिघांवर प्रत्येकी पाच लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. यूपी एसटीएफला राजस्थानमधील अजमेर शरीफजवळ गुड्डू मुस्लिमचे लोकेशन सापडल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार पुढे तपास सुरू आहे.