मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /कायच्या काय! माहेरच्यांना वाटलं ती मेली, अंत्यसंस्कार झाले आणि 2 वर्षांनी समोर आलं सत्य

कायच्या काय! माहेरच्यांना वाटलं ती मेली, अंत्यसंस्कार झाले आणि 2 वर्षांनी समोर आलं सत्य

महिलेचा आपल्या पतीसोबत वाद झाला. ती रागावून माहेरी निघून गेली. काही दिवसानंतर ती गायब झाली. तिचा मृत्यू झाल्याचं समजलं. सासरच्यांविरोधात तक्रारही दाखल झाली. पण....

महिलेचा आपल्या पतीसोबत वाद झाला. ती रागावून माहेरी निघून गेली. काही दिवसानंतर ती गायब झाली. तिचा मृत्यू झाल्याचं समजलं. सासरच्यांविरोधात तक्रारही दाखल झाली. पण....

महिलेचा आपल्या पतीसोबत वाद झाला. ती रागावून माहेरी निघून गेली. काही दिवसानंतर ती गायब झाली. तिचा मृत्यू झाल्याचं समजलं. सासरच्यांविरोधात तक्रारही दाखल झाली. पण....

कैमूर, 23 फेब्रुवारी : भारतासारख्या देशात अनेक चित्रविचित्र घटना घडत असतात. आता अशीच एक घटना बिहारमधून (Bihar) समोर आली आहे.

यात एक महिलेचा आपल्या पतीसोबत वाद (Wife and husband quarreled) झाला. ती रागावून माहेरी निघून गेली. काही दिवसानंतर ती गायब झाली. यादरम्यानच कैमूर जवळ देवराढ कला या ठिकाणच्या कालव्याजवळ एक मृतदेह (dead body) मिळाला. या मृतदेहाची ओळख नीटपणे पटत नव्हती. मात्र माहेरच्या लोकांनी चप्पल, कपडे आणि रुमालावरून या मृतदेहाची ओळख पटवली.

यानंतर मृत महिलेच्या घरच्यांनी सासरी नवरा, सासू, नणंद यांनी आपल्या मुलीची हत्या केल्याची (murder) तक्रार (complain) पोलिसात केली. या प्रकरणाचा तपास पोलीस (police investigation was on) करत होते. मात्र पोलिसांना या महिलेच्या मृत्यूचे पुरेसे पुरावे मिळत नव्हते. मात्र ती जिवंत असल्याचे अनेक पुरावे (evidences) त्यांना मिळाले.

पोलिसांनी तपास पुढे नेला आणि ही विवाहिता आपल्या प्रेमिकासोबत सापडली. युपीच्या सोनभद्र जिल्ह्यातून (Uttar Pradesh Sonbhadra District) या दोघांना दोन वर्षांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं. हा प्रेमी महिलेचा भावजी लागतो. चौकशीत समोर आलं, की या दोघांचे पूर्वीपासून प्रेमसंबंध (love affair) होते आणि दोघांनी पळून जात लग्नसुद्धा केलं होतं.

दोघांना दोन वर्षांचं मुलसुद्धा आहे. या महिलेचा प्रेमी आधीपासून विवाहित असून त्याचे पहिल्या पत्नीपासून दोन मुलं आहेत. ही दोन मुलंही यांच्यासोबत राहतात. या महिलेनं सांगितलं, की तिचा आधीचा पती तिला सतत मारहाण करायचा. त्यानंतर ती माहेरी आली आणि तिला आपल्या भावजींसोबत प्रेम झालं. त्यानंतर दोघे पळून गेले.

हेही वाचा - मावशीच्या घरातून परतताना बहिणींसोबत घृणास्पद कृत्य; 2 दिवसांनी जंगलात सापडल्या

महिलेचं म्हणणं आहे, की तिला आता याच माणसासोबत राहायचं आहे. महिलेची आई मुलगी जिवंत परत आल्यानं आनंदात आहे. विशेष म्हणजे, 2018 मध्ये माहेरच्यांनी मृत समजून या महिलेवर अंत्यसंस्कारही (final cremation) केले होते.

First published:
top videos

    Tags: Bihar, Case in india, Crime news, Marriage, Murder news, Wife and husband