27 फेब्रुवारी, रायपूर : Chhattisgarh News: छत्तीसगडमधील जशपूरमध्ये शनिवारी रात्री उशिरा एका तरुणाने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केली. तरुणाच्या आत्महत्येमागील कारण त्याची भीती असल्याचं सांगितलं जात आहे. शनिवारी सकाळी गावकऱ्यांनी तरुणावर एका गर्भवती महिलेला छेडल्याचा आरोप केला होता. त्याच्याविरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली होती. या प्रकरणातून तरुणाने आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांना अद्याप कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही. तुरुंगात जाण्याच्या भीतीने तरुणाने हे पाऊल उचलल्याची शक्यता आहे. गर्भवती महिलेसोबत छेडछाड केल्याचा आरोप… मिळालेल्या माहितीनुसार, हर्राडांड गावचा निवासी संदीप खललो (32 वर्षे) शनिवारी मामेमारी करण्यासाठी गेला होता. तेथून घरी परतत असताना त्याने गर्भवती महिलेचा हात पकडला होता आणि तिची छेड काढली होती. ज्यानंतर महिला जमिनीवर पडली. घरी पोहोचल्यानंतर महिलेने घरातल्यांचा सर्व हकीकत सांगितली. आजूबाजूलाही ही बाब कळताच महिला संतापल्या. रविवारी त्या तरुणाविरोधात पोलिसात तक्रार करण्यासाठी जाणार होत्या, यादरम्यान सकाळी कळालं की, तरुणाने आत्महत्या केली आहे. हे ही वाचा- दारू पिऊन रिक्षाचालकाचं धक्कादायक कृत्य; रस्त्याच्या मधोमध थांबला अन्… भीतीने केली आत्महत्या… पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुण काल मासेमारी करून घरी परतत होता. यादरम्यान त्याने एका गर्भवती महिलेचा हात पकडला आणि तिच्यासोबत गैरवर्तणूक केली. गावातील पंचाने भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला, तर महिलेने पोलिसात तक्रार करणार असल्याचं सांगितलं. या भीतीने तरुणाने आत्महत्या केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.