जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / Jalgaon Child Trafficking : चिमुरड्यांच्या तस्करीचं मोठं प्रकरण उघडकीस; रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे 59 मुलांची सुटका

Jalgaon Child Trafficking : चिमुरड्यांच्या तस्करीचं मोठं प्रकरण उघडकीस; रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे 59 मुलांची सुटका

संग्रहित छायाचित्र

संग्रहित छायाचित्र

Jalgaon Child Trafficking : बिहारमधून रेल्वेद्वारे मानवी तस्करीचा रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. भुसावळ व मनमाड रेल्वे स्थानकावर धडक कारवाई करून रेल्वे पोलिसांनी 59 मुलांची सुटका केली.

  • -MIN READ Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

इम्तियाज अली, प्रतिनिधी जळगाव, 13 जून : सोमवारी (12 जून) देशभरात बाल कामगार विरोधी दिन साजरा करण्यात आला. याला एक दिवस उलटत नाही तोच बिहारमधून महाराष्ट्रात लहान मुलांच्या संशयीत तस्करीचं एक मोठं प्रकरण उघडकीस आलं आहे. दानापूर पुणे एक्सप्रेस मधून भुसावळ येथे ताब्यात घेण्यात आलेल्या 29 अल्पवयीन मुलांची करण्यात सुटका आली आहे. या सर्व मुलांचे वय 8 ते 15 वर्षे वयोगटातील असल्याचे समोर आले आहे. जळगाव जिल्हा बालकल्याण विभागाच्या वतीने 29 मुलांना बिहार राज्यातील अररिया व पूर्णिया बाल कल्याण विभागासमोर करण्यात येणार सादर करण्यात येणार आहे. काय आहे प्रकरण? बिहार राज्यातून महाराष्ट्रात मानवी तस्करीचा प्रकार रेल्वे पोलिसांनी हाणून पाडला असून भुसावळ व मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा बल व लोहमार्ग पोलिसांनी धडक कारवाई करून 59 मुलांची सुखरूप सुटका केली आहे. रेल्वे सुरक्षा बलाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही धडक कारवाई करण्यात आली. भुसावळ रेल्वे स्थानकावर 29 तर मनमाड रेल्वे स्थानकावर 30 मुलांची रेल्वे पोलिसांनी सुटका करत या मुलांना नाशिक व जळगाव येथील बाल रक्षक गृहात रवांगी केली आहे. वाचा - Crime News : आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी लेकीने 81 वर्षीय बापासोबतच.. घटनेने पोलिसांनाही धक्का रेल्वे पोलिसांच्या या कारवाईमुळे एकीकडे खळबळ उडाली असताना याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी भुसावळ येथून एक तर मनमाड येथून चार संशय त्यांना अटक केली आहे. या संशयीतांना रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आले आहे. तर रेल्वे सुरक्षा बलाने केलेल्या चौकशीत सदर मुलांची मदरशाच्या नावाखाली बिहार राज्यातील पूर्णिया जिल्ह्यामधून सांगलीमध्ये तस्करी केली जात असल्याची माहिती समोर आली. सुटका करण्यात आलेल्या 59 मुलांची वैद्यकीय तपासणी करून या मुलांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

रेल्वेद्वारे मानवी तस्करीचा प्रकार समोर आल्याने या प्रकरणात सखोल चौकशी रेल्वे पोलिसांकडून केली जात आहे. या मुलांच्या पालकांचा शोध घेऊन या प्रकरणाचा मुळापर्यंत पोहोचण्याचे मोठे आव्हान रेल्वे पोलिसांसमोर आहे. याच प्रकरणातून मानवी तस्करीचे अजूनही काही धागेदोरे समोर येतात का हे देखील पाहणे महत्त्वाचे आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात