Home /News /crime /

Shocking! काँग्रेस आमदाराच्या 16 वर्षीय मुलाची आत्महत्या; डोक्यात झाडल्या गोळ्या

Shocking! काँग्रेस आमदाराच्या 16 वर्षीय मुलाची आत्महत्या; डोक्यात झाडल्या गोळ्या

त्याच्या आत्महत्येनंतर पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली आहे.

    Jabalpur MLA Son Suicide : जबलपुर, 11 नोव्हेंबर : बरगी विधानसभामधून (Baragi MLA) एक धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. येथील काँग्रेस आमदार (Congress MLA) संजय यादव यांच्या सर्वात लहान मुलाने स्वत:च्याच घरात सायंकाळी 4 वाजता गोळी घालून आत्महत्या (Suicide) केली. यानंतर तातडीने 16 वर्षी विभोर यादवला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सांगितलं जात आहे की, विभोरने आपल्या खोलीत स्वत:वर गोळी झाडली. विभोरने एक सुसाइड नोटही (Suicide Note) लिहिली होती. घटनेची माहिती मिळताच, काँग्रेस आमदार संजय यादव सह माजी मंत्री तरुण भनोत आणि काँग्रेसचे अनेक दिग्गज नेता रुग्णालयाच्या बाहेर पोहोचले. दुसरीकडे रुग्णालयाच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिसांची टीम दाखल झाली होती. घटनेमागील कारण अद्याप समोर आलेलं नाही. विभोर यादव हा काँग्रेसचे आमदार संजय यादव यांचा लहान मुलगा होता. हे ही वाचा-यवतमाळमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी डॉक्टरची हत्या, परिसरात खळबळ विभोरच्या खोलीत सापडली सुसाइड नोट.. मिळालेल्या माहितीनुसार, विभोर यादवच्या डोक्यात गोळी लागली. मात्र विभोरने असं पाऊल का उचललं यामागील कारण स्पष्ट झालेलं नाही. विभोरच्या खोलीत पोलिसांना एक सुसाइड नोट सापडली आहे. ज्यात त्याने लिहिलं आहे की, माझी आई आणि वडील खूप चांगले आहेत. पोलिसांनी विभोरची खोली लॉक करीत तपास सुरू केला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Congress, Crime news, Person suicide

    पुढील बातम्या