जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / सुरक्षा अधिकाऱ्याकडे केली पत्नीची तक्रार; एअरपोर्टवर खळबळ, फ्लाइटही झाली मिस

सुरक्षा अधिकाऱ्याकडे केली पत्नीची तक्रार; एअरपोर्टवर खळबळ, फ्लाइटही झाली मिस

सुरक्षा अधिकाऱ्याकडे केली पत्नीची तक्रार; एअरपोर्टवर खळबळ, फ्लाइटही झाली मिस

पतीने केलेल्या मूर्खपणामुळे संपूर्ण कुटुंबाला याचा त्रास सहन करावा लागला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    इंदूर, 8 सप्टेंबर : पत्नीसोबत इंदूर एअरपोर्टवरून (indore airport news) प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला विनोद भारी पडला आहे. इंदूर एअरपोर्टवर सोमवारी सायंकाळी एका 30 वर्षी व्यक्तीच्या थट्टेमुळे गोंधळ उडाला. त्याने सुरक्षा तपास अधिकाऱ्यांना सांगितलं की, त्याच्या पत्नीची नीट तपासणी करा. कारण ती आपल्या बॅगेत बॉम्ब घेऊन फिरते. यानंतर एअरपोर्टवर खळबळ उडाली. यानंतर तो म्हणाला की, मी तर थट्टा करीत होता. मात्र तोपर्यंत एअरपोर्टवर खळबळ उडाली होती. प्रवाशांना इंदूरहून लखनऊला जायचं होतं. मात्र नवऱ्याच्या या थट्टेमुळे त्यांची फ्लाइट सुटली. आणि कुटुंबीयांनाही त्रास सहन करावा लागला. बुधवारी या घटनेचा खुलासा झाला. एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, ही व्यक्ती वाराणसी येथे राहणारी आहे. ते कुटुंब इंदूरमध्ये एका नातेवाईकांकडे लग्नासाठी आले होते. पती-पत्नी आपल्या मुलांसह इंदूरहून लखनऊला जात होते. यादरम्यान एअरपोर्टवर त्यांच्या सामानाचा तपास केला जात होता.

    तपासादरम्यान मजा-मस्ती… सुरक्षा तपासादरम्यान गौरव मनानीने थट्टा करण्याचा विचार केला. त्याच्या सामानाचा तपास केला जात होता. यादरम्यान एअरलाइनच्या काही कर्मचाऱ्यांना तो म्हणाला की, त्याच्या पत्नीची व्यवस्थित तपासणी करावी. कारण तिच्या बॅगेत बॉम्बही होऊ शकतो. बॉम्बबद्दल ऐकताच सुरक्षा अधिकारी तैनात झाले.

    Online मूर्ती मागवल्या अन् घडला ‘हा’ चमत्कार; डिलिव्हरी बॉयनं अशी केली पोलखोल

    एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. यानंतर कुटुंबीयांना सुरक्षा तपासाच्या रांगेतून वेगळं केलं. आणि कुटुंबाचा तपास सुरू केला. कुटुंबाची हिस्ट्रीदेखील तपासण्यात आली. कुटुंबाच्या नातेवाईकांनाही बोलवण्यात आलं. यादरम्यान कळालं की, पतीने पत्नीची थट्टा केली होती. यानंतर अधिकारीही संतापले.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात