मुंबई, 8 एप्रिल : प्रेम (Love) हे जात, धर्म, वय आणि देशांच्या सीमा याचा विचार करत नाही, असं म्हणतात. पण प्रेमात बुडालेल्या मंडळींना आजूबाजूची परिस्थिती, कुटुंब कशाचाही विचार राहत नाही. त्यामुळे मोठी अडचण निर्माण होते. या गोष्टीला प्रेम हे नाव देणं बावळपटणा आहे. नुकत्यात उघड झालेल्या एका प्रकरणात भारतामधील महिला (Indian Women) प्रेमात इतकी आकंठ बुडाली की तिने तिचं घर सोडलं. ती इतक्यावरच थांबली नाही. तर, तिनं बेकायदेशीर पद्धतीनं पाकिस्तानात (Pakistan) जाण्याचा निर्णय घेतला.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार ही महिला ओडिशा (Odisha) राज्यातील आहे. पाकिस्तानमधील प्रियकराला भेटण्यासाठी ती पंजाबमधील गुरदासपूर (Gurdaspur) जिल्ह्यातील भारत-पाकिस्तान बॉर्डर (India -Pak Border) ओलांडून पाकिस्तानात जाण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी बीएसफच्या (BSF) जवानांनी तिला ताब्यात घेतले आणि पोलिसांकडं सोपवलं.
6 वर्षांपूर्वी झालं होतं लग्न
बटाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचं वय साधारण 25 वर्ष असून ती विवाहित आहे. तसंच तिला 5 वर्षांचा एक मुलगा देखील आहे. तिच्या लग्नाला 6 वर्ष झाली आहे. दोन वर्षांपूर्वी एका ऑनलाईन अॅपच्या माध्यमातून तिची पाकिस्तानातील तरुणाशी मैत्री झाली. या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. या प्रेमातूनच कोणत्याही परिस्थितीमध्ये बॉर्डर पार करुन पाकिस्तानात जाण्याचं खूळ तिच्या डोक्यात शिरलं. ती जवळपास दोन महिन्यांपूर्वी नवऱ्याला सोडून माहेरी आली होती. त्यानंतर तिनं पाकिस्तानातील प्रियकराला भेटण्याचा निर्धार केला.
( महिलांनी नाही तर पुरुषांनी बुरखा घालावा! इम्रान खान यांच्या पूर्व पत्नीचा सल्ला)
महिलेजवळ होते दागिने
ज्या मुलावर ती प्रेम करत होती, त्याचं नाव मोहम्मद मान असून तो इस्लामाबादचा आहे. हे दोघं दिवसातील अनेक वेळ फोनवर बोलत असत. या महिलेजवळ साठ ग्रॅम सोनं देखील सापडलं आहे. ते तिनं घरातून पाकिस्तानात जाण्यासाठी आणलं होतं. पंजाब पोलिसांनी या प्रकरणात ओडिशातील संबंधित पोलिसांशी संपर्क साधला. त्यावेळी महिलेच्या पतीनं ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्याचं आढळून आले. आता या महिलेला तिच्या परिवाराकडं सोपवण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.