Home /News /crime /

1,758 रुपयांसाठी गर्लफ्रेंड संतापली; भलामोठा सुरा घेऊन बॉयफ्रेंडवर केला जीवघेणा हल्ला

1,758 रुपयांसाठी गर्लफ्रेंड संतापली; भलामोठा सुरा घेऊन बॉयफ्रेंडवर केला जीवघेणा हल्ला

चाकूहल्ला केल्यावर तरुणीने आपल्या बॉयफ्रेंडच्या डोळ्यात बोटही खुपसलं.

    इमिंघम, 20 फेब्रुवारी : युनायटेड किंग्डममधील (United kingdom) इमिंघम शहरात एक भयानक घटना घडली आहे. इथं एका व्यक्तीबाबत आर्थिक अडचणीतून (economical problems) त्याच्या गर्लफ्रेंडनं (girlfriend) विचित्र पाऊल उचललं आहे. गोल्डसॅक असं या व्यक्तीचं नाव आहे. या गोल्डसॅकनं आपल्या गर्लफ्रेंडकडून 20 युरो कर्जाऊ (borrowed 20 euros) घेतले होते. आता आर्थिक अडचणीमुळं त्याला ते परत देणं शक्य नव्हतं. त्याच्या गर्लफ्रेडनं या कारणानं एक धक्कादायक पाऊल उचललं. त्या गर्लफ्रेंडनं थेट त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला. चाकू (knife attack) आणि हातोडा वापरून तिनं हा हल्ला केला. यात हा बॉयफ्रेंड खूप भयानक जखमी (injured) झाला. पोलिसांनी सांगितल्यानुसार, रबेका स्मिथ हिनं आपल्या बॉयफ्रेंड गोल्डसॅक याला 20 युरो म्हणजेच जवळपास 1, 758 रुपये दिले होते. ही रक्कम तो परत देऊ शकत नव्हता. या गोष्टीमुळं संतापून गर्लफ्रेंडनं त्याच्यावर थेट जीवघेणा हल्लाच केला. स्मिथ हिनं 6 इंची चाकू वापरून हल्ला केला. तिनं त्याच्या चेहऱ्यावर न थांबता एकामागे एक वार केले. हा हल्ला इतका तीव्र होता, की गोल्डसॅकला आपला बचाव करण्याची संधीच मिळाली नाही. हेही वाचा पत्नीची हत्या करुन पोलिसांना फोन,मग पोलिसांवर गोळीबार करत स्वतःही केली आत्महत्या चाकूहल्ला केल्यावर स्मिथनं आपल्या बॉयफ्रेंडच्या डोळ्यात बोटही खुपसलं. गोल्डसॅक जोरजोरात ओरडत होता. पण स्मिथला त्याची दया आली नाही. तो पळण्याचा प्रयत्न करत होता तेवढ्यात स्मिथनं हातोडा आणला आणि त्याच्या हातावर वार केले. ही घटना 24 जुलै 2020 रोजी घडली होती. आता कोर्टानं स्मिथला दहा वर्षांची कैद सुनावली आहे. गोल्डसॅक म्हणतो, की तो आजही खूप घाबरलेला आहे. आयुष्यात कधीच तो कुठल्या महिलेवर विश्वास (can not believe any woman) करू शकणार नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Attack, Crime news, International, Money, Relationship, Shocking news, United kingdom

    पुढील बातम्या