जाहिरात
मराठी बातम्या / क्राईम / बापरे! दोन चिमुरड्यांच्या क्रूर हत्येने राजधानी हादरली

बापरे! दोन चिमुरड्यांच्या क्रूर हत्येने राजधानी हादरली

बापरे! दोन चिमुरड्यांच्या क्रूर हत्येने राजधानी हादरली

सहा वर्षांचा पूरव आणि चार वर्षांचा अभी सकाळी घरात एकटे असताना हा प्रकार घडला. वडिलांची डेअरी आहे. आई-वडील डेअरीच्या कामासाठी बाहेर असतानाच ही घटना घडली.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 जानेवारी : कोरोनाच्या काळातही हिंसा (violence) आणि गुन्हेगारीची प्रकरणं थांबण्याचं नाव घेत नाहीत. उलट त्यांच्यात वाढच झाल्याचं चित्र आहे. एक भयानक क्रूर घटना दिल्लीत घडली आहे. दिल्ल्लीच्या रोहिणी सेक्टर 35 (Delhi Rohini Sector 35) मध्ये ही हिंसक घटना घडली आहे. इथे दोन चिमुरड्यांची  हत्या (Delhi murder) करण्यात आली आहे. दोन्ही मुलांचे मृतदेह (dead bodies) बुधवारी सकाळी त्यांच्या घरात आढळून आले. याबद्दल लगोलग स्थानिक पोलिसांना कळवलं गेलं. पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी (postmortem) पाठवले आहेत. पोलिसांना सुरवातीच्या तपासात समजले, की दोन्ही मुलांचा गळा आवळण्यात आला आहे. पोस्टमार्टमचा अहवाल आल्यानंतर हा प्रकार हत्येचा असल्याचे कळाले. हत्या झालेली दोन मुलं म्हणजे सहा वर्षांचा पूरव आणि चार वर्षांचा अभी आहे. दोघांच्या वडिलांची याच भागात डेअरी (dairy shop) आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही दोन्ही मुलं आपल्या आई-वडिलांसह राहत होती. पूरव शाळेत जात होता. अभीचा काही दिवसांनी पालक शाळेत प्रवेश करणार होते. सकाळी या दोघांचे पालक डेअरीत गेले होते. काही तासांनी दोघे परत आले तेव्हा त्यांनी खोलीत दोन्ही मुलांना झोपलेलं पाहिलं. मात्र बराच वेळ झाला तरी दोघांपैकी कुणीही हलत नव्हतं. यामुळं आईला संशय आला. तिनं दोघांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला मात्र उपयोग झाला नाही. आई मोठमोठ्यानं रडू लागली. शेजारी धावत आले. दोन्ही मुलांना लगोलग हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथं डॉक्टरांनी मुलांना मृत घोषित केलं. यामुळं पालकांना मोठाच धक्का बसला. घडलेल्या प्रकारची माहिती पोलिसांना देण्यात आली. नातेवाईकांच्या सांगण्यानुसार, घरातील कपाटं उघडी होती. त्यात ठेवलेले लाखोंचे दागिने (jewellery) गायब होते. चोर घरात घुसले तेव्हा मुलांना जाग आली असेल. त्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला तेव्हा या चोरांनी त्यांची निर्दय हत्या आलेली असेल असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात