मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

‘मी लग्न न करता गर्भवती राहिले, डॉक्टरांकडे गेली तर...’ दिल्लीतील तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव

‘मी लग्न न करता गर्भवती राहिले, डॉक्टरांकडे गेली तर...’ दिल्लीतील तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव

भारतात एखादी तरुणी लग्नाशिवाय गर्भवती राहिली असेल तर तिला गर्भपात करण्यासाठी कोणतेही कायदेशीर पर्याय उपलब्ध नाहीत

भारतात एखादी तरुणी लग्नाशिवाय गर्भवती राहिली असेल तर तिला गर्भपात करण्यासाठी कोणतेही कायदेशीर पर्याय उपलब्ध नाहीत

भारतात एखादी तरुणी लग्नाशिवाय गर्भवती राहिली असेल तर तिला गर्भपात करण्यासाठी कोणतेही कायदेशीर पर्याय उपलब्ध नाहीत

 नवी दिल्ली, 22 सप्टेंबर : भारतात लग्न झालेलं नसताना तरुणीने गर्भवती (Pregnant) राहणं समाजाला मान्य नाही. तरुणीसह तिच्या कुटुंबीयांनाही समाजात वाईट अनुभव येतात. तसंच भारतात एखादी तरुणी लग्नाशिवाय गर्भवती राहिली असेल तर तिला गर्भपात करण्यासाठी कोणतेही कायदेशीर पर्याय उपलब्ध नाहीत. त्यामुळे तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा अशा मुलींचा पैशांसाठी डॉक्टर गैरफायदा घेतात. अशीच एक घटना 19 वर्षांच्या एका मुलीबरोबर घडली. ती रिलेशनमध्ये होती आणि एकेदिवशी तिच्या लक्षात आलं, की ती गर्भवती आहे, त्यानंतर गर्भपात (Abortion) करण्यासाठी ती एका डॉक्टरकडे गेली. तिथे तिच्याबरोबर काय घडलं, याची माहिती तिने दिली आहे.
काय आहे या मुलीची कथा?
या मुलीबरोबर ही घटना घडली तेव्हा ती कॉलेजची विद्यार्थिनी होती. गर्भपाताबद्दल जागरूकता पसरवणाऱ्या 'पपाया परेड' या वेबाईटवर तिने तिची कथा सांगितली. तिने लिहिलंय, "मी पहिल्यांदा गरोदर राहिले तेव्हा मी 19 वर्षांची होते. मला आधीच युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) हा आजार होता, त्यामुळे मी वारंवार शौचालयाला जाण्याकडे दुर्लक्ष केलं, जे गर्भधारणेच्या प्रमुख लक्षणांपैकी एक आहे. मला मॉर्निंग सिकनेस किंवा मळमळ यासारखी कोणतीही समस्या नव्हती. पण कित्येक आठवड्यांनंतरही जेव्हा मासिक पाळी आली नाही तेव्हा मला भीती वाटू लागली. मी रिलेशनशिपमध्ये होते आणि मला भीती होती की मी गर्भवती आहे. माझा प्रियकर त्यावेळी मुंबईत (Mumbai) होता आणि मी माझ्या कॉलेजच्या सुट्ट्यांसाठी गुवाहाटीला आले होते. त्याच्याशिवाय आणि माझ्या काही जवळच्या लोकांशिवाय या परिस्थितीला सामोरं जाणं माझ्यासाठी कठीण होतं.”
तिने पुढे लिहिलं, ‘मला अनेकदा अनियमित मासिक पाळी येत असे, त्यामुळे सुरुवातीला माझ्या बॉयफ्रेंडने त्याकडे दुर्लक्ष केलं एक महिना असाच गेला आणि पुढचा महिना सुरु झाला; पण मला मासिक पाळी आली नाही. त्यानंतर त्यालाही काळजी वाटू लागली. यासाठी मी स्वतः अनेक वेळा प्रेग्नन्सी टेस्ट केल्या, ज्या सर्व पॉझिटिव्ह आल्या. पाच ते सहा आठवड्यांत मला कळलं, की मी गर्भवती आहे आणि ते माझ्यासाठी खूप भीतीदायक होतं. कारण त्यावेळी मी माझ्या कुटुंबाबरोबर राहत होते.’
डॉक्टरने सर्जिकल अबॉर्शन ऑपरेशनसाठी आणला दबाव
‘बॉयफ्रेंडने मला काही डॉक्टरांची नावं सांगितली ज्यांच्याशी तो आधीच बोलला होता आणि परिस्थिती समजवून सांगितली. मी माझ्या एका मैत्रिणीबरोबर डॉक्टरांकडे गेले होते. तिथे पोहोचल्यानंतर डॉक्टर मी सर्जिकल अबॉर्शन करायला हवं, यावर जोर देऊ लागले. खरं तर सर्जरीच्या औषधांशिवायही हे शक्य होतं, पण त्याचा त्यांनी उल्लेखही केला नाही. पण मी माहिती गोळा केली आणि हे सर्व कसं करायचं ते मी ठरवलं. त्याबद्दल मी डॉक्टरांना सांगितलं, पण त्यांना ते आवडलं नाही. मला औषधांबद्दल माहीत आहे हे त्यांना आवडलं नाही. कारण कदाचित त्यांना वाटलं असेल, की आता त्यांना वाटले तेवढे पैसे मिळणार नाहीत,’ असंही या तरुणीने लिहिलंय.
तिने पुढे लिहिलंय, ‘त्यांनी मला सांगितलेल्या औषधांची किंमत केमिस्टच्या औषधांपेक्षा तिप्पट जास्त होती. त्याबद्दल मला माझ्या दुसऱ्या गर्भपातावेळी माहीत झालं. याशिवाय माझ्याकडून फी म्हणून त्यांनी 1500 रुपयेही घेतले. मला कोणताही त्रास नको होता आणि मला या परिस्थितीतून बाहेर यायचं होतं. डॉक्टरांनी मला ती औषधं कशी घ्यायची आहेत आणि घेतल्यानंतर कसं वाटेल ते सांगितलं. औषध घेतल्यानंतर पहिला दिवस माझ्या आयुष्यातील सर्वांत वेदनादायक दिवस होता. मला खूप रक्तस्त्राव होत होता आणि असह्य वेदना होत होत्या. माझं शरीर अशक्त झालं होतं आणि त्याचदिवशी मला मुंबईला जाणारी फ्लाईट पकडायची होती.’
 
काही पैशांच्या लालसेपोटी डॉक्टरने मला ट्रॉमामध्ये टाकलं
तरुणीने लिहिलंय, "मी त्यावेळी विचार करत होते की, जर त्या डॉक्टरने पैशाचा लोभ केला नसता, तर मला एवढा त्रास सहन करावा लागला नसता. मी तरुण होते, निरोगी होते आणि मला कोणतीही समस्या नव्हती, म्हणून मी हा मार्ग निवडला होता. पण डॉक्टरने माझ्या निर्णयाबाबत नकारात्मक वृत्ती दाखवली, त्यामुळे मला खूप तणावातून जावं लागलं. जेव्हा मी सर्जिकल अबॉर्शनसाठी नकार दिला तेव्हा डॉक्टरचं वागणं पूर्णपणे बदललं होतं, ते पाहून मला खूप आश्चर्य वाटलं होतं. माझा गर्भपात झाला आहे याची 100% खात्री होईपर्यंत मी त्या संपूर्ण कालावधीत खूप तणावातून गेले. गर्भपात व्हायला एकूण 20 ते 25 दिवस लागले. तेव्हा कदाचित माझ्यावर मूल होण्यासाठी दबाव टाकला जात आहे असा विचार करून मी रोज रडत असे.’
दरम्यान, या संपूर्ण परिस्थितीतून सावरण्यासाठी तिच्या जवळच्या मित्रांनी आणि बॉयफ्रेंडने तिला खूप साथ दिल्याचं तरुणीनी लिहिलंय. परंतु, अशा अनेक मुली आहेत ज्या अशा स्थितीत एकट्या पडतात आणि माहिती नसल्यामुळे आणि भीतीमुळे चुकीचे निर्णय घेऊन आपल्या शरीरावर त्याचे वाईट परिणाम करून घेतात.
First published:

पुढील बातम्या