मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /पीएचडीधारक विद्यार्थ्याचा प्रताप, तयार केले बंदी असलेले अंमली पदार्थ पण...

पीएचडीधारक विद्यार्थ्याचा प्रताप, तयार केले बंदी असलेले अंमली पदार्थ पण...

बंदी असलेला अंमली पदार्थ तयार करून, त्याचा पुरवठा करणाऱ्या एका रसायनशास्रातील पीएचडीधारकाला (PhD) पोलिसांनी अटक केली

बंदी असलेला अंमली पदार्थ तयार करून, त्याचा पुरवठा करणाऱ्या एका रसायनशास्रातील पीएचडीधारकाला (PhD) पोलिसांनी अटक केली

बंदी असलेला अंमली पदार्थ तयार करून, त्याचा पुरवठा करणाऱ्या एका रसायनशास्रातील पीएचडीधारकाला (PhD) पोलिसांनी अटक केली

    हैदराबाद, 16 मार्च : महानगरांमध्ये अंमली पदार्थांचा पुरवठा करणारी अनेक रॅकेट सुरू असतात. मुंबई, दिल्लीसारख्या ठिकाणी तर सेलिब्रिटींपासून अनेक जणांची नावं यामध्ये समोर आली आहेत. आता पोलिसांनी अशाच एका अंमली पदार्थांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बंदी असलेला अंमली पदार्थ तयार करून, त्याचा पुरवठा करणाऱ्या एका रसायनशास्रातील पीएचडीधारकाला (PhD) पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबतच त्याच्या दोघा साथीदारांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

    हैदराबादमध्ये सायबराबाद पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. या रॅकेटमध्ये एक जण पोलिस कॉन्स्टेबल आहे. त्यांच्याकडून 8.50 कोटी रुपयांचं अल्प्राझोलम (Alprazolam) जप्त करण्यात आलं, अशी माहिती हैदराबादमधील बालानगर झोनच्या पोलीस उपायुक्त (Deputy Commissioner of Police DCP) पद्मजा यांनी पत्रकारांना दिली.

    या प्रकरणाबाबत माहिती देताना पद्मजा म्हणाल्या, ‘ मेडक जिल्ह्यातील मधुर गावात राहणारा गुडीकली लिंगगौड या 36 वर्षाच्या आरोपीने ऑरगॅनिक केमिस्ट्रीमध्ये पीएचडीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर त्याने हैदराबादमधील जीडिमेटला इंडस्ट्रीयल एरियामध्ये डॉ. गौडज लॅबरोटरीज (Dr. Gowds Laboratories) नावाची कंपनी सुरू केली. लवकर पैसे कमवण्याच्या लोभापोटी लिंगगौडने विजयवाडामध्ये फार्मास्युटिकल कंपनी चालवणाऱ्या किरण कुमार या मित्रासोबत अंमली पदार्थ तयार करायचा प्रस्ताव मांडला.

    (वाचा - मेव्हणीने KBC मध्ये जिंकले 50 लाख, पैशांच्या लालसेपोटी पत्नीला दिला तीन तलाक)

    अल्प्राझोलम तयार करण्यासाठीचा कच्चा माल लिंगगौडा किरणला पुरवायचा. तयार झालेले अंमली पदार्थ किरण त्याचा ड्रायव्हर विनोद कुमारमार्फत (27) विजयवाड्यावरून हैदराबादला लिंगगौडाकडे पाठवायचा आणि त्याला कमिशन द्यायचा. लिंगगौडाचा मेव्हणा माधुरी रामकृष्ण गौड हा पोलीस कॉन्स्टेबल असून, हा माल पोलीस तपासणीत अडवला जाणार नाही याची काळजी रामकृष्ण गौड घ्यायचा.’ पेठ बशीरबादचे पोलीस आणि स्पेशल ऑपरेशन टीमने जीडिमेटला पाइपलाइन रोडवर रामकृष्ण गौडला ड्रगसोबत अटक केली.

    यावेळी 139 किलो अल्प्राझोलम जप्त करण्यात आलं असून त्याची बाजारातील किंमत 8.5 कोटी रुपये आहे. अल्प्राझोलम हे अंमली पदार्थ तयार करण्यासाठी वापरतात. लिंगगौड, ड्रायव्हर आणि रामकृष्ण यांना पोलिसांनी अटक केली असून, या तिघांसह किरण कुमारवर गुन्हा दाखल केला आहे. किरण कुमार फरार असून त्याचा तपास पोलीस करत आहेत.

    First published:

    Tags: Crime, Drug case, Drugs, Hyderabad, Illegal, Shocking news