जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / लग्नानंतरही सुधरला नाही, स्वत:च्या वहिनीसोबत दिसले आक्षेपार्ह फोटो, पत्नीने विरोध केला तर...

लग्नानंतरही सुधरला नाही, स्वत:च्या वहिनीसोबत दिसले आक्षेपार्ह फोटो, पत्नीने विरोध केला तर...

मृत महिला

मृत महिला

पतीने धक्कादायक पाऊल उचलत संसाराची राखरांगोळी केली.

  • -MIN READ Bihar
  • Last Updated :

छपरा, 29 एप्रिल : पतीच्या अवैध संबंधांना विरोध केला म्हणून एका महिलेसोबत धक्कादायक घटना घडली. तिला आपले प्राण गमवावे लागले आहेत. सख्ख्या वहिनीसोबत अनैतिक संबंध असल्याने पत्नी सतत विरोध करत होती. त्यामुळे पतीने संतापजनक पाऊल उचलत पत्नीची हत्या केली. या घटनेनंतर महिलेच्या पतीसह सासरचे लोक घर सोडून फरार झाले आहेत. ही घटना छपरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौना मिश्रा गटाशी संबंधित आहे. याठिकाणी नवविवाहित महिलेचा मृतदेह तिच्या सासरच्या घरातून संशयास्पद परिस्थितीत आढळून आला.

News18लोकमत
News18लोकमत

प्रिंस गिरी असे आरोपीचे नाव आहे. तर गुंजा असे मृत नवविवाहितेचे नाव आहे. कुटुंबीयांमध्ये घातपाताची शक्यता व्यक्त करत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी सदर हॉस्पिटल छपरा येथे पाठवला आहे. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मृत गुंजाचा भाऊ रिपू ​​गिरी याने सांगितले की, त्याच्या बहिणीचे लग्न 10 महिन्यांपूर्वी मौना मिश्री तळी येथील प्रिंस गिरीसोबत झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी गुंजाला प्रिन्सचे त्याच्या वहिनीसोबत अनैतिक संबंध असल्याची माहिती मिळाली. याबाबत ती वारंवार तक्रार करायची. तिच्या तक्रारीवरून गुंजाला नेहमी मारहाण केली जायची. मात्र, कुटुंबीय आपापसात हे प्रकरण मिटवत होते. दरम्यान, गुंजाने त्याच्या वहिणीची काही आक्षेपार्ह स्थितीत पतीचे फोटो समोर आल्यानंतर उघडपणे विरोध करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे तिचा पती संतापला आणि अनैतिक संबंधाला विरोध केल्याने पतीने पत्नी गुंजा हिला फाशी देत तिची हत्या केली. हत्येनंतर सासरचे लोक घर सोडून पळून गेले. दरम्यान, घराच्या व्हरांड्यातून नवविवाहित महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. मृत गुंजाचा भाऊ रिपू ​​गिरी याने सांगितले की, घटनेची माहिती शहर पोलीस ठाण्यात देण्यात आली. नगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी छपरा सदर रुग्णालयात पाठवला. जिथे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे शहर पोलीस ठाण्याचे अध्यक्ष रत्नेश वर्मा यांनी सांगितले. कुटुंबीयांनी हत्येप्रकरणी एफआयआर दाखल केला असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच अधिक माहिती समोर येणार आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात