जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / 5 वर्षांपूर्वी प्रेमविवाह पण काही दिवसांनी पत्नीविषयी पतीला वेगळच समजलं आणि…

5 वर्षांपूर्वी प्रेमविवाह पण काही दिवसांनी पत्नीविषयी पतीला वेगळच समजलं आणि…

लव्ह राशीफळ 2023

लव्ह राशीफळ 2023

पतीने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह घराच्या अंगणात पुरल्याची घटना समोर आली आहे.

  • -MIN READ Local18 New Delhi,New Delhi,Delhi
  • Last Updated :

लखेश्वर यादव (जंजगीर चंपा), 07 एप्रिल : छत्तीसगडच्या शक्ती जिल्ह्यातील रायपुरा गावात परस्पर वादातून पतीने पत्नीची हत्या करून तिचा मृतदेह घराच्या अंगणात पुरल्याची घटना समोर आली आहे. पत्नीची हत्या करून मृतदेह पूरून पळून गेला. ही बाब संशयास्पद वाटल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. दरम्यान दोघांचा 5 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायपुरा न्यू हायस्कूलसमोर राहणारा राजेशकुमार साहू हा मूळचा दररभंठा आदिल येथील रहिवासी आहे. रायपुरा हे त्यांच्या आजोबांचे घर असल्याने पत्नी बिंदू सिंग साहूसोबत त्यांच्या आईच्या नावावर असलेल्या घरात राहत होते.

News18लोकमत
News18लोकमत

मजुरी करत असल्याने पती बाहेर कामाला जात होता. मूळची बिहारची असलेल्या बिंदू सिंग हिच्याशी साहूसोबत ओळख झाली. यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्यांनी काही काळानंतर कोर्टात प्रेमविवाह केला. त्यांना तीन मुलेही आहेत, ते दोनच दिवसांपूर्वी बाहेरून रायपुरात आले होते.

दरम्यान बिंदू घराजवळील हातपंपावर पाणी आणण्यासाठी जात होती. परंतु ती त्यादिवशी का आली नाही याची विचारपूस करण्यास काही महिला गेल्या. या दरम्यान पती साहू हा घराजवळ खड्डा काढत असल्याचे महिलांच्या निदर्शनास आले. दरम्यान बिंदू कुठे दिसत नसल्याने चर्चा सुरू झाली. यावेळी काही लोक त्याच्या घरी गेले आणि तुम्ही खड्ड्यात माती का भरत आहात, अशी विचारणा केली.

जाहिरात

राजेश साहूने पत्नीची हत्या करून तिला गाडून तिच्यावर माती टाकत असल्याचे सांगितले. त्यामुळे शेजारीही घाबरले आणि त्यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. बारी येथे तहसीलदार अनुराधा पटेल यांच्या उपस्थितीत उत्खनन करण्यात आले, तेथून महिलेचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

लैंगिक अत्याचाराची तक्रार करणाऱ्या अल्पवयीन मुलीला इमारतीत नेऊन.. पुणे हादरलं

खड्ड्यातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. पोस्टमॉर्टमनंतर बिंदू साहू यांचा मृतदेह सासरे केशवप्रसाद साहू यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. पोलीस आरोपी पती राजेश साहू याचा शोध घेत आहेत.

लोकांना फसवून ऑनलाईन पैसे काढण्याची गुन्हेगारांची नवी पद्धत, व्हाल आश्चर्यचकीत

बराद्वार पोलीस ठाण्याचे प्रभारी राजेश पटेल यांनी सांगितले की, रात्री पती-पत्नीमध्ये वाद झाल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर राजेशने पत्नी बिंदू साहूची हत्या करून मृतदेह घराच्या अंगणात टाकून पळ काढला. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे. पोस्टमॉर्टमचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात